Vasco Damodar Saptah  Dainik Gomantak
गोवा

Damodar Saptah: दामोदर सप्‍ताहाची जय्‍यत तयारी! 30 जुलैपासून प्रारंभ; मान्‍यवर कलाकारांच्‍या होणार मैफली

Vasco Saptah: श्री दामोदर मंदिरासमोर भव्य मंडप उभारण्याबरोबरच गायनाच्या मैफलींसाठी शहरात अनेक ठिकाणी मंडप उभारण्यात येत आहेत. मुरगाव पालिका व वीज खात्याने कामाला सुरवात केली आहे.

Sameer Panditrao

वास्को: येथील प्रसिद्ध श्री दामोदर भजनी सप्ताह यंदा १२६वे वर्ष साजरे करत आहे. या सप्‍ताहास बुधवारी ३० जुलैपासून सुरवात होणार असून तयारी युद्धपातळीवर सुरू झाली आहे. भजनी सप्ताह उत्सव समितीने आपले गायक कलाकार जाहीर केले आहेत. समितीतर्फे उद्योजक श्रीपाद शेट्ये व संजय शेट्ये यांच्या सौजन्याने प्रसिद्ध गायक विश्‍‍वजीत बोरवणकर यांची खास मैफल सप्ताहाच्या पूर्वरात्री रंगणार आहे.

श्री दामोदर मंदिरासमोर भव्य मंडप उभारण्याबरोबरच गायनाच्या मैफलींसाठी शहरात अनेक ठिकाणी मंडप उभारण्यात येत आहेत. मुरगाव पालिका व वीज खात्याने कामाला सुरवात केली आहे. मंगळवारी २९ रोजी संध्याकाळी ७ वाजता मंदिरासमोर उभारण्यात आलेल्या मंडपात विश्‍‍वजीत बोरवणकर यांचा संगीत कार्यक्रम होणार आहे.

त्यांना तबल्यावर संकेत खलप, पखवाजवर किशोर तेली, हार्मोनियमवर दत्तराज म्हाळशी, टाळ आदित्य गावकर, की-बोर्ड विष्णू शिरोडकर तर हॅण्डसॉनिक अवधूत तारी साथसंगत करतील. निवेदनाची जबाबदारी अनुश्री फडणीस देशपांडे सांभाळतील.

सप्ताह उत्सवात परंपरेने सहभागी होणारा दैवज्ञ ब्राह्मण समाज, गाडेकार समाज, फैलवाले समाज, नाभिक समाज व विश्वकर्मा ब्राह्मण समाज यांनीही प्रसिद्ध गायक व वादक कलाकारांना आमंत्रित केले आहे.

आरती अंकलीकर टिकेकर, राजयोग धुरी यांचे गायन ः बुधवारी ३० रोजी दुपारी १२.३० वाजता श्री दामोदराच्‍या अखंड भजनी सप्ताहाला प्रारंभ होईल. संध्याकाळी ठिकठिकाणांहून भजनी दिंड्या पारांसह निघतील. उत्सव समितीतर्फे (बाजारकर) यंदा प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांना तसेच मुंबईतील उदयोन्मुख गायक कलाकार राजयोग धुरी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांचे कार्यक्रम सप्ताह उत्सवात पहिल्या रात्री होणार आहेत.

विविध समाजांतर्फे कार्यक्रम

फैलवाले समाजातर्फे ३० जुलैला संध्‍याकाळी विविध कार्यक्रम सादर केले जातील. त्‍यात गायकांच्‍या मैफलींबरोबरच आशादीप शाळेच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तूंचे वाटप, संघाच्या निवृत कामगारांचा सत्कार करण्यात येईल. रात्री १० वाजता गाडेकर समाजाचे कार्यक्रम सुरू होतील. विश्‍‍वकर्मा ब्राह्मण समाजातर्फे सायंकाळी ६.३० ते ९.३० मुरगाव पालिकेच्या मागे कलाकारांची खास संगीत बैठक होणार आहे. दैवज्ञ ब्राह्मण समाजातर्फे रात्री १० ते १ वाजेपर्यंत टॅक्सी स्टँडजवळ कार्यक्रम होतील तर नाभिक समाजातर्फे सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत गायन मैफल होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT