Silver umbrella  Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: वास्को रेल्वे स्थानकावर आढळली पाच लाख रुपयांची चांदीची छत्री; पोलिसही चक्रावले

Vasco Railway Station Goa: सापडलेली छत्री ८७.५० टक्के चांदीची असल्याचे सोनाराने सांगितले. या छत्रीचे वजन ६.४ किलोग्रॅम असून त्याचे बाजार मूल्य ५,३७,६०० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

Pramod Yadav

वास्को: रेल्वे स्टेशनवर मंगळवारी (१५ एप्रिल) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नियमित गस्त सुरू असताना वास्को रेल्वे पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसह आरपीएफ कर्मचाऱ्यांना बेडशीटमध्ये गुंडाळलेली एक बॅग सापडली. तपासणी केल्यावर, बॅगेमध्ये चांदीची छत्री सापडली. या वस्तूचे वजन अंदाजे ६.४ किलोग्रॅम असून त्याची किमत ५,३७,६०० रुपये आहे.

Vasco Police

पोलिस निरीक्षक आनंद शिरोडकर, अमरनाथ पासी, पोलिस उपनिरीक्षक कृष्णा तळपी यांच्यासह आरपीएफ अधिकारी रोहित दक्षित वास्को रेल्वे स्थानकावर नियमित पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना बेवारस स्थितीत पडलेली एक बॅग आढळून आली.

या बॅगेत बेडशीटमध्ये गुंडाळलेली चांदीची छत्री आढळून आली. पोलिसांनी सापडलेल्या वस्तूची खात्री करण्यासाठी सोनाराला बोलवून त्याची खातरजमा केली असता छत्रीची चांदीची असल्याचे निष्पन्न झाले.

सापडलेली छत्री ८७.५० टक्के चांदीची असल्याचे सोनाराने सांगितले. या छत्रीचे वजन ६.४ किलोग्रॅम असून त्याचे बाजार मूल्य ५,३७,६०० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी पंचनामा करुन छत्री जप्त केली आहे.

रेल्वे पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, सापडलेली वस्तू त्याच्या मूळ मालकाला परत करण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

Goa Live News Updates: ऑनलाईन फ्रॉडमधून ३ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

SCROLL FOR NEXT