Amar Naik Murder Case Dainik Gomantak
गोवा

Amar Naik Murder Case: दुबईवरुन परत येताच पोलिसांच्या जाळ्यात अडकला; अमर नाईक हत्येप्रकरणी तीन वर्षानंतर आरोपीला विमानतळावरून अटक

Mopa Airport: अमर नाईक हत्येप्रकरणी वास्को पोलिसांनी कथित आरोपी रियाझ शेख याला अटक केली. दुबईवरुन परत येताच मोपा विमानतळावर रियाझला पकडण्यात आले.

Manish Jadhav

अमर नाईक हत्येप्रकरणी वास्को पोलिसांनी कथित आरोपी रियाझ शेखला आज (28 ऑक्टोबर) अटक केली. तब्बल तीन वर्षांनंतर रियाझला अटक करण्यात आली. दुबईवरुन परत येताच मोपा विमानतळावर रियाझला पकडण्यात आले. वास्को पोलिसांनी ही कारवाई केली. अमर नाईक यांच्या हत्येत आरोपी रियाझचा हात होता.

याआगोदर दोघांना अटक!

दरम्यान, बोगमाळो रंगवी इस्टेट येथे 15 जुलै 2021 रोजी अमर नाईक यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अमर नाईक यांच्या हत्येप्रकरणी याआगोदर शैलेश गुप्ता(29) व शिवम सिंग(22) (उत्तर प्रदेश) या संशयितांना अटक करण्यात आली होती. मोठ्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी या दोन्ही आरोपींना (Accused) कासावली येथून ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान पैसे घेऊन हा खून केल्याचे त्यांनी कबुलही केले होते. पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोन्ही संशयित हे मूळ उत्तरप्रदेशमधील असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी दिली होती.

हत्येचं कारण काय?

प्रॉपर्टी डीलिंग करण्याचा बहाणा करुन बोलावून बोगमाळो रंघवी इस्टेटमध्ये नवेवाडे वास्को येथील काल अमर नाईक यांच्या डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. गोळीबारात जखमी झालेल्या अमर नाईक यांना उपचारासाठी चिखली येथील रुग्णालयात (Hospital) नेत असतांनाच मृत घोषित करण्यात आले होते. अमर नाईक यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस होता यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला असल्याचे सांगून त्यांच्या बहिणीने हंबरडा फोडला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

SCROLL FOR NEXT