Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : मनोरुग्ण व्यक्तीला मारहाण करणं महागात पडलं

वास्को शहरात लहान मुलाचे अपहरण करीत असल्याचा आरोप करत लोकांनी एकाला जबर चोप दिला होता. याप्रकरणी पोलिसांनी आता तीन आरोपींना अटक केली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime : वास्को शहरात मंगळवारी सायंकाळी लहान मुलाचे अपहरण करीत असल्याचा आरोप करत लोकांनी एकाला जबर चोप दिला होता. याप्रकरणी पोलिसांनी आता तीन आरोपींना अटक केली आहे. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याच व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

वास्कोत मनोरुग्णाला मंगळवारी मुलं पळवत असल्याचा आरोप करत एका व्यक्तीला जमावाने बेदम मारहाण करण्यात आली होती. वेळीच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी त्याला जमावाच्या तावडीतून सोडविले. अखेर मारहाण करण्यात आलेला इसम मनोरुग्ण असल्याची माहिती वास्को पोलिसांनी दिली.

सध्या गोव्यासह इतर राज्यांतही लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी फिरत असल्याची माहिती पोलिसांमार्फत सोशल मीडियावर फिरत आहे. सर्व पालकांनी आपल्या मुलांना सांभाळावे, अशा संदेश पोलिसांनी यानिमित्ताने दिला आहे.

मंगळवारी सायंकाळी 5 वाजता वास्कोतील टी. बी. कुन्हा मासळी मार्केटच्या बाजूला एक इसम लहान मुलाचे अपहरण करीत असल्याची आरडाओरड सुरू होताच जमावाने त्या इसमाला चोपायला सुरुवात केली. मुलांचे अपहरण करीत असल्याचा आरोप करत लोकांनी त्या इसमाला दंडुके, लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. अखेर पोलिसांचे गस्त घालणारे वाहन तेथे आल्यामुळे तो बचावला.

संशयित व्यक्तीची चौकशी केल्यावर त्याने त्याचे नाव धेन जोन्स, वय 52 वर्षे पाँडिचेरी असे सांगितले. चौकशीत तो समाधानकारक उत्तरे देत नव्हता आणि तो मानसिकदृष्ट्या अस्थिर दिसत होता, त्यामुळे त्याची योग्य काळजी घेण्यासाठी त्याच्याकडे कोणीही नव्हते. भविष्यात कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी संशयित व्यक्तीला मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे की नाही हे तपासण्यासाठी एसडीएच चिखली येथे वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT