Vasco Police Arrest Two Persons  Dainik Gomantak
गोवा

Vasco Crime News : मोबाईल दुकानातून फोन चोरी करणाऱ्या दोघांना अटक; वास्को पोलिसांची कारवाई

संशयितांकडून 28 हजार 989 रुपयांचे दोन फोन जप्त करण्यात आले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco Police Arrest Two Persons For Allegedly Stealing Two Mobiles: मोबाईलच्या दुकानातून दोन मोबाईल चोरल्याप्रकरणी दोघा संशयितांना वास्को पोलिसांनी अटक केली आहे. मोबाईल दुकानाच्या मालकाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. संशयितांकडून 28 हजार 989 रुपयांचे दोन फोन जप्त करण्यात आले आहेत.

वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या मोबाईलच्या दुकानातून दोन अज्ञात व्यक्तींनी 14 ऑगस्ट रोजी दोन सॅमसंग कंपनीचे मोबाईल चोरी केल्याची तक्रार दुकान मालकाने वास्को पोलिसांत दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासले व संशयितांची ओळख पटवली.

तक्रारीच्या आधारे संशयितांना अटक करण्यात आली. सॅव्हियो फर्नांडिस आणि नेल्सन आल्मेडा दोघेही रा. दोना पावला अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. संशयित हे मासेमारीचा व्यवसाय करीत असत.

दोघा संशयितांकडून सॅमसंग कंपनीचे 28 हजार 989 रुपयांचे दोन फोन जप्त करण्यात आले आहेत. वास्को पोलिस प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT