Vasco Dainik Gomantak
गोवा

Vasco News : वास्कोत गोवा शिपयार्ड, अनन्या परिवारतर्फे पोषण जागृती संदेश

Vasco News : कार्यक्रमात या अन्नधान्यांमधील पोषक तत्वांचा फायदा आणि त्यांना दररोजच्या आहारात समाविष्ट करण्याचे महत्त्व यावर सविस्तर चर्चा झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco News : वास्को, गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या ‘सीएसआर’ उपक्रमांतर्गत अनन्या परिवार यांनी ‘गोवा लायव्हलीहूड फोरम’सोबत पोषण जागरूकतेचा संदेश पसरवणारा विशेषतः महिला आणि बालकांवर केंद्रित कार्यक्रम १४ रोजी आयोजित केला होता.

वास्को येथील झेड स्क्वेअर बॅंकेट हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात मान्यवरांसह स्थानिक नागरिकांनी मिलेटमधील पोषणमूल्य आणि ते विशेषतः महिला आणि बालकांसाठी उपयुक्त कसे आहेत यावर चर्चा केली.

यावेळी आमदार कृष्णा (दाजी) साळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच नगराध्यक्ष गिरीश बोरकर, नगरसेविका शमी साळकर आणि अमित चोपडेकर, जीएसएलचे शशिकांत कांबळे आणि जीएसएलचे सीएसआर प्रमुख प्रशांत गुंजिकर उपस्थित होते.

कार्यक्रमात या अन्नधान्यांमधील पोषक तत्वांचा फायदा आणि त्यांना दररोजच्या आहारात समाविष्ट करण्याचे महत्त्व यावर सविस्तर चर्चा झाली.

गोवा लिव्हलूड्स फोरमच्या सचिव आशा वेर्णेकर यांनी स्वागत केले. निकिता गुप्ता यांनी सूत्रसंचालन केले.

आमदार साळकर यांनी गरोदर, स्तनपान करणाऱ्या आणि रक्त कमी असलेल्या महिला आणि बालकांसाठी मिलेटच्या फायद्यांवर भर दिला आणि येणाऱ्या पिढ्यांच्या आरोग्यासाठी या पारंपरिक अन्नाचा वापर वाढवण्याची गरज अधोरेखित केली. कार्यक्रमात पोषणयुक्त मिलेट आधारित किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Senior T20 cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

Goa Politics: खरी कुजबुज, मिकीचा 'सोशल ॲक्‍टिविस्‍ट'शी पंगा

सिलिंग फॅन तुटून विद्यार्थीनीच्या अंगावर पडला, पर्ये – सत्तरी सरकारी शाळेतील चौथीची विद्यार्थीनी जखमी

Goa Live News: साखळी नगरपालिकेवर सौरऊर्जा प्रकल्प; पालिकेला मिळणार 30 केव्ही वीज

Kopardem Accident: कोपार्डे-सत्तरी येथे बस-दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार जखमी

SCROLL FOR NEXT