Vasco News  Dainik Gomantak
गोवा

Vasco News : विकासकामांद्वारेच विरोधकांना उत्तर; उपनगराध्यक्ष रामचंद्र कामत

प्रभाग 7 मध्ये 22 लाखांची कामे सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

मुरगावचे उपनगराध्यक्ष रामचंद्र कामत यांनी 15 व्या वित्त आयोगांतर्गत प्रभागात 22 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ श्रीफळ वाढवून केला. लोकांना काय हवे ते सांगू द्या, मी माझ्या प्रभागात विक्रमी विकासकामे राबवून स्वत:ला सिद्ध करेन, असे सांगून त्यांनी विरोधकांना कानपिचक्या दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत नगरसेवक प्रजय मयेकर, दामोदर कासकर, मंजुषा पिळणकर आदी उपस्थित होते.

उपनगराध्यक्ष कामत हे प्रभागात विकासकामे करीत नाहीत,असा आरोप काही नवभाजपसीयांनी केला होता. प्रभाग 7 मध्ये गेल्या काही दिवसांपासून रामचंद्र कामत व नव भाजप कार्यकर्ते यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. कामत यांना लक्ष्य करण्यामागील उद्देश स्पष्ट होऊ शकला नाही. परंतु लहानसहान गोष्टीवरून दोन्ही बाजूंनी चाललेल्या आरोपांबद्दल चर्चा सुरू आहे.

संबंधित प्रभागामध्ये कोणतीही कामे करत नसल्याने त्यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणूक लढवून फक्त 100 मते मिळवून दाखवावीत, असे आव्हानही कामत यांना दिले आहे. कामत हे निष्क्रिय असून, ते भाजपचे सदस्य असूनही ते आमदार आमोणकर यांच्या विरोधात वक्तव्य करीत असल्याचे भाजपच्या नव कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्स म्हणाले, की रवींद्र भवन ते आरोग्य केंद्र बायणा हा रस्ता पूर्वी पाण्याखाली जात होता. ही समस्या आता दूर होणार असल्याचे त्यांनी सांगून प्रभाग 7 मधील उर्वरित विकासकामांना लवकर चालना मिळणार आहे.

आमोणकर समर्थक मनाने कॉंग्रेसीच !

याप्रकरणी नगरसेवक व उपनगराध्यक्ष रामचंद्र कामत व नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्ज यांनी पलटवार करताना भाजपमध्ये आलेल्या आमदार आमोणकर यांच्या समर्थकांची मानसिकता अद्याप काँग्रेसचीच असल्याचा दावा केला.

त्यामुळे कारण नसतानाही भाजपाच्याच एका बूथ अध्यक्षाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार त्या नव कार्यकत्यांकडून घडला असल्याचे त्यांनी सांगितले. कामत यांनी आपल्या प्रभागातील कामासंबंधी सतत आपल्याकडे, मुरगाव पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून कामे करून घेतली असल्याचे रॉड्रिग्ज यांनी सांगितले.

आपण कोणती कामे केली आहेत, हे येथील नागरिकांना माहीत आहे. मात्र ज्यांनी मानसिकता अद्याप कॉंग्रेसची आहे ते आपल्यावर नाहक आरोप करीत आहेत. आमदार आमोणकर यांनी भाजपात प्रवेश केल्यावर ते निष्ठावंत झाले, परंतु त्यांच्यासोबत आलेले कार्यकर्ते अद्याप भाजपविरोधात बोलत असल्याचे व समाज माध्यमांत पक्षविरोधी पोस्ट करीत असल्याचे दिसत आहे. त्यांना योग्य ती समज देण्याची गरज आहे.

रामचंद्र कामत,उपनगराध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: खासदार विरियातो, प्रदेशाध्यक्ष पाटकर पोलिसांच्या ताब्यात; काँग्रेसचे कॅश फॉर जॉब विरोधात आंदोलन

IFFI Goa 2024: "आलीयाच्या सुरक्षेसाठी मी त्याला हाकललं होतं" काही तासांतच 'ते' विधान फिरवल्याने इम्तियाज अली वादाच्या भोवऱ्यात

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

National Cashew Day: गोव्यात काजूचे पीक घेणे का बनत आहे कठीण? कारणे जाणून घ्या..

Goa Bench: निवृत्त कर्मचारी सेवा नियमांत बदल; निवृत्तीवेतनाची थकबाकी देण्यास एक वर्षाची मुदत

SCROLL FOR NEXT