Vasco Murder Case Dainik Gomantak
गोवा

Vasco Murder Case: पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून, संशयित पोलिसांच्या ताब्यात

छातीत चाकू भोसकून खून केल्याची घटना

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco Murder Case नवेवाडे - वास्को येथील हाउसिंग बोर्ड कॉलनीतील चाळीत राहणाऱ्या एका युवकाने तेथेच राहणाऱ्या दुसऱ्या एका युवकाच्या छातीत चाकू भोसकून खून केल्याची घटना घडल्याने नवेवाडे वास्को परिसरात प्रचंड खळबळ माजली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली आहे. अँथनी जुझे फर्नांडिस (वय २३) या तरुणाने मेहबूब शेख (वय २७) या युवकाच्या छातीत चाकू खुपसल्याने तो जागीच ठार झाला.

अँथनी फर्नांडिस व मेहबूब शेख यांच्यात प्रथम शाब्दिक बाचाबाची झाली, नंतर त्यांच्यातील भांडण विकोपाला पोचल्याने अँथनी याने आपल्याकडील चाकूने मेहबूब याच्यावर हल्ला केला, त्यात तो जागीच ठार झाला.

वास्को पोलिसांनी या प्रकरणी संशयित अँथनी जुझे फर्नांडिस याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.

या दोघांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून वादविवाद सुरू होता. त्यांच्यात अनेकदा काहींना काही कारणाने बाचाबाची होत होती. त्यांच्यात आज दुपारी पावणेचार वाजता बाचाबाची सुरू झाली. नंतर दोघांमध्ये झटापट सुरू झाली.

यावेळी अँथनीचा लहान भाऊ सातान याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात त्याला यश आले नाही. अखेर अँथनी याने आपल्या खिशातील चाकू काढून मेहबूब याच्या छातीत खुपसला.

यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मेहबूब याला सातान याने त्वरित दुचाकीवरून चिखली उपजिल्हा इस्पितळात नेले, परंतु तेथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

यावेळी इस्पितळात मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी त्वरित इस्पितळात येऊन गर्दीवर नियंत्रण आणले. वास्को पोलिसांनी मेहबूब शेख याचा खून करणाऱ्या संशयित अँथनी फर्नांडिस याला ताब्यात घेतले.

मुरगाव तालुक्याचे पोलिस उपअधीक्षक शेख सलीम, पोलिस निरीक्षक कपिल नायक, पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल नाईक, उपनिरीक्षक मयूर सावंत यांनी खून झालेल्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला. पोलिस निरीक्षक कपिल नायक याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT