अभंगाचे लोकार्पण करताना आमदार दाजी साळकर Dainik Gomantak
गोवा

Vasco: वास्कोचे आमदार दाजी साळकर यांच्या हस्ते तीन अभंगाचे लोकार्पण

देवत्वाशी जवळीक साधण्यासाठी संतानी नामांचा व अभंगांचा आधार घेतला. महाराष्ट्र व गोवा ही अध्यात्मिक भूमी आहे; दाजी साळकर

दैनिक गोमन्तक

वास्को: देवत्वाशी जवळीक साधण्यासाठी संतानी नामांचा व अभंगांचा आधार घेतला. महाराष्ट्र व गोवा ही अध्यात्मिक भूमी आहे. दोन्ही राज्यातील आध्यात्मिक परंपरा समान आहेत. साडेचारशे वर्षाच्या जुलूमी राजवटीत आमची समृद्ध संस्कृती आमच्या पूर्वजांनी टिकवून ठेवली. त्याच संस्कृतीचा एक अविभाज्य असलेले, व गीतकार रामानंद तारी यांनी लिहीलेल्या आणि गिरीश नाईक यांनी संगीतबद्ध केलेल्या तीन अभंगाचे लोकार्पण या साईंच्या पुण्यभूमीत करण्यास मिळते हे माझे भाग्य समजतो. ही सुद्धा देवाची सेवा आहे ती त्यांनी तशीच चालू ठेवावी असे उदगार वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी काढले .

‌‌‌‌‌‌‌‌

शिर्डी येथे अखिल गोमंतक साईसेवा मंडळ गोवा, व गजांतसाई प्रकाशन आखाडा आणि श्री साईबाबा भजनी मंडळ बेतकी- खांडोळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अभंग लोकार्पण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दाजी साळकर बोलत होते

याप्रसंगी व्यासपीठावर खास निमंत्रित म्हणून गोव्याचे वाहतूक निरिक्षक दामोदर माशेलकर, वाहतूक सह निरिक्षक शिवानंद पेडणेकर, माशेलचे पंचसदस्य सिध्दार्थ गाड, तसेच उद्योजक कमलप्रसाद यादव, अखिल गोमंतक साईसेवा मंडळाचे अध्यक्ष वज्राधर कळगुंटकर, खजिनदार प्रेमानंद कोचरेकर, गीतकार रामानंद तारी आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे ज्ञानेश्वर गावडे, दिवीज माशेलकर, दर्श माशेलकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

प्रास्ताविक पर बोलताना मंडळाचे अध्यक्ष वज्राधर कळगुंटकर म्हणाले की आमचे अष्टपैलू साईसेवक रामानंद तारी यानी साईंवर लिहीलेल्या सुंदर अभंगाचे पुण्यभूमीत लोकार्पण ही संस्थेसाठी भूषणावह गोष्ट आहे. त्यांनी तशीच चालू ठेवावी.

प्रमुख पाहुणे आमदार दाजी साळकर यांनी "कृपाळू सदगुरू साईं भुकेला भक्तीचा" व वाहतूक निरिक्षक दामोदर माशेलकर यांनी"हाकेला ओ द्या आतातरी साईबाबा "व वाहतूक सह निरिक्षक शिवानंद पेडणेकर यांनी" दशरथ नंदना, रामराम म्हणां नित्य रामराम म्हणां, "या तीन अभंगाचे लोकार्पण केले.

पुण्यभूमीत साईंच्या अभंगाचे लोकार्पण करण्यास मिळाले ही आनंदाची गोष्ट आहे. भविष्यात असेच लिखाण त्यांनी करावे अशी शुभेच्छा वाहतूक निरिक्षक दामोदर माशेलकर यांनी दिली. याप्रसंगी पंचसदस्य सिध्दार्थ गाड, याचेही अभिनंदन करणारे भाषण झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामानंद तारी व आभार प्रेमानंद कोचरेकर यांनी मानले. सदर अभंगाना गिरीश नाईक यांचे संगीत आहे. गायक कलाकार आनंद घाडी, व शंकर फडते हे आहेत.हामोॅनियमसाथ पुंडलिक घाडी, तबला साथ राजु नाईक व टाळसंगत मनोहर गावडे, राजु गावडे, सुदेश फडते यांची आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग नंदादीप नाईक यांचे आहे. यावेळी आध्यात्मिक गुरू राजु गावडे याचे मौलिक मार्गदर्शन लाभले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT