Vasco market Dainik Gomantak
गोवा

Vasco बाजारपेठत दिवाळीची लगबग; तयार फराळाकडे नागरिकांचा कल

डाळ, तेल, साखरसह वस्तूंच्या किमती वाढल्या

दैनिक गोमन्तक

वास्को: गेल्या तीन वर्षानंतर कोविड महामारीनंतर लोक यंदा मोठ्या प्रमाणात दिवाळी सण साजरा करत आहेत. वास्को बाजारपेठ आज सकाळ संध्याकाळ गर्दीने फुलून गेली होती. यंदा लोक मोकळा श्वास घेत दिवाळीची खरेदी करताना दिसत होते. मात्र सर्वसामान्यांचे बजेट दिवाळी आधी कोलमडले आहे. बाजारातून तसेच ऑर्डर देऊन फराळ घेणेही सर्वसामान्यांसाठी महाग बनले आहे. वाढत्या महागाईमुळे दिवाळीचा तयार फराळ देखील यंदा महागला आहे.

(Vasco market has bloomed with the onset of Diwali festival)

कोरोना महामारीतून सावरतानाच महागाई दिवसेंदिवस वाढत असल्याने महिला वर्गाला काटकसर करत महिन्याचा खर्च भागवावा लागत आहे. दिवाळी सण असल्याने बाजारात गर्दी दिसत आहे. डाळ, तेल, साखर या सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. घरी फराळ बनवणे व तयार फराळांच्या दरही वाढलेले आहेत.

घरी फराळ तयार करण्याची प्रथा आता दिवसेंदिवस कमी होत असल्याने तयार फराळाची मागणी वाढू लागली आहे. प्रत्येक वर्षी किमतीमध्ये वाढ असते. यंदा तेलाच्या तसेच डाळीच्या किमती वाढल्यामुळे फराळाचे दरही वाढले आहे. चकली 500 रु किलो, बेसन लाडू 450 रुपये किलो, गोड शंकरपाळी 400 रु. किलो, चिवडा 400 रुपये किलो, सुक्या मेव्याचे लाडू 1200 ते 1500 रुपये किलो या दराने विकले जातात.

दरम्यान एका बाजूला महागाईचा चटका बसत असला तरी बाजारात मात्र खरेदीसाठी लोकांची गर्दी उफळली आहे. खर्चावर मर्यादा, पण कशीबशी दिवाळी सण साजरा करून आपली परंपरा जोपासायला पाहिजे यामुळे लोकांची आज बाजारात गर्दी उसळली होती.

दीवाळी सण साजरा करण्यासाठी लागणारे पोहे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर कंदिल, पणत्या, मेणबत्त्या फटाके, रांगोळी, फळे व इतर साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध आहे.

दरमान आज शनिवार सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी उफाळली होती. तसेच उद्या रविवारीही गर्दी उफळणार यात शंकाच नाही. आज लाखो रुपयांची उलाढाल झाली हे लोकांनी बाजारात केलेल्या गर्दीवरून समजले. दरम्यान काही वेळ पावसाने हजेरी लावली व लोकांची गर्दी विस्कळीत झाली. मात्र लोकांनी आपली खरेदी सोडली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT