वास्को द गामा: गोव्याच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेलं वास्को हे शहर पोर्तुगीज एक्सप्लोरर वास्को द गामा याच्या नावावरून ओळखलं जातं. आज आपण या शहराबद्दल सगळीच माहिती जाणून घेणार आहोत आणि यानंतर जर का तुम्ही गोव्यात फिरायला जाणार असाल तर दक्षिण गोव्यातील या शहराला नक्कीच भेट देऊ शकता. वास्को शहर ४०० वर्षांपूर्वी बांधलेल्या सेंट अँड्र्यूज चर्चसाठी खास करून ओळखलं जातं, पण याशिवाय वास्कोमध्ये काय पाहाल चला जाणून घेऊया.
प्रसिद्ध मुरगाव पोर्ट
लक्षात घ्या गोव्यातील प्रसिद्ध मुरगाव पोर्ट याच वास्को शहरात आहे. हे पोर्ट तुम्ही शहरापासून ४ किलोमीटर अंतरावर जाऊन पाहू शकता. वास्को आणि समुद्र किनारा म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो बोगमाळो बीच हा दक्षिण भागातील अनेक प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे आणि येथे राहण्यासाठी आलिशान तसेच मध्यम श्रेणीतील हॉटेल्स उपलब्ध करून दिली जातात.
इंडियन नेव्हल एव्हिएशन म्युझियम
वास्कोबद्दल सर्वात महत्वाची जागा म्हणजे इथे असलेलं इंडियन नेव्हल एव्हिएशन म्युझियम. तुम्ही वास्कोला असाल तर भारतातील या प्रसिद्ध म्युझियमला भेट नक्कीच दिली पाहिजे. इथे लढाऊ विमानं आणि नौदलाशी संबंधित इतर वस्तूंचे प्रदर्शन पाहायला मिळतं.
वास्कोच्या किनाऱ्यांवर कयाकिंग किंवा डायव्हिंगचा अनुभव घेता येतो. याशिवाय जुवारी बीच, जपानी गार्डन, वेल्साओ बीच, बायणा बीच आणि वास्कोचे म्युनिसिपल मार्केट ही देखील या शहराची इतर आकर्षणं आहेत.
उत्तम रेस्टॉरंट्स
येथील उत्तम रेस्टॉरंट्समध्ये झेड रूफटॉप लाउंज बार अँड ग्रिल, ग्रेपवाइन मल्टी-कुझीन रेस्टॉरंट, अनंताश्रम, प्लेजर पाय केक्स अँड कॉफी आणि ओरी पॅन एशियन कुझीन यांचा समावेश होतो.
दाबोळीचं विमानतळ
गोव्यातील पाहिलं विमानतळ म्हणजेच दाबोळीचं विमानतळ वास्को द गामापासून ४ किलोमीटर अंतरावर आहे. वास्को द गामा रेल्वे स्टेशन हे गोव्यातील प्रमुख रेल्वे स्टेशन्सपैकी एक असून बहुतेक महत्त्वाच्या ट्रेन्स येथे थांबतात. रेल्वे स्टेशनजवळ अनेक बजेटमध्ये बसणारी हॉटेल्स आहेत.
थोडक्यात, वास्को द गामा हे केवळ एक शहर नाही, तर व्यापाराचं एक प्रमुख केंद्र आहे, इथे इतिहासाच्या खुणा शांत कोपऱ्यांमध्ये दडलेल्या आहेत आणि इथले किनारे मनाला शांतता आणि एक सुखद अनुभव देतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.