वास्को: दहा वर्षांपासून लटकलेला नवीन वास्को मासळी मार्केट प्रकल्प बांधण्यासाठी लवकरच पुढाकार घेण्यात येणार आहे. ज्या पद्धतीने मासळी मार्केटमधील विक्रेत्यांना हा प्रकल्प पाहिजे त्याच पद्धतीने त्यांना तो बांधून दिला जाणार आहे. यंदाच्या निवडणुकीत मला वास्को मासळी मार्केटमधील मासळी विकणाऱ्या महिलांनी पाठिंबा दिला असून, यासाठी त्यांची प्रत्यक्षात भेट घेऊन आभार मानण्यासाठी आपण वास्को मासळी मार्केटमध्ये आल्याची माहिती वास्कोचे आमदार कृष्णा (दाजी) साळकर यांनी दिली. (Vasco fish market project)
यावेळी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, वास्को भाजप मंडळ अध्यक्ष दीपक नाईक, मुरगावच्या नगरसेविका शमी साळकर, नगरसेवक गिरीश बोरकर, माजी नगरसेविका लविना डीसोझा, फियोला रेगो,आर्नल्ड रेगो,वामन चोडणकर आणि इतरांनी वास्को मासळी मार्केटमध्ये भेट दिली.सुरुवातीला साळकर यांनी मार्केटमधील सायबीणीला पुष्पहार अर्पण करून मेणबत्त्या लावल्या. नंतर आमदार साळकर यांनी मासळी मार्केटमधील महिला विक्रेत्यांनी त्यांना या निवडणुकीत पाठिंबा दिल्याने त्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच नवीन मासळी मार्केट प्रकल्पाच्या विषयावर साळकर यांनी त्यांच्याशी चर्चा केली. यंदाच्या निवडणुकीत पाठिंबा दिल्याने त्यांचे येथे आभार मानण्यात आल्याची माहिती साळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. नंतर नवीन मासळी मार्केट प्रकल्पाबाबत वास्को मासळी मार्केटमधील मासळी विक्रेत्यांनी त्यांच्याशी चर्चा केल्याचे साळकर यांनी सांगितले.
मासळी मार्केटमधील मासळी विकणाऱ्यांना तसेच वास्कोतील नागरिकांना नवीन मासळी मार्केट प्रकल्प पाहिजे असून तो उभारण्यात यावा, यासाठी लवकरात लवकर उचित पावले टाकण्यात येतील,
ज्या पद्धतीने मार्केटमधील मासळीविक्रेत्यांना नवीन मासळी मार्केट प्रकल्प पाहिजे त्याच पद्धतीने तो उभारला जाणार असल्याचे साळकर यांनी सांगितले. येणाऱ्या दिवसात मासळी मार्केटमधील मासळी विक्रेत्या, फादर मायकल आणि इतर संबंधितांसह बैठक घेऊन नवीन मासळी मार्केट प्रकल्प टउभारण्याबाबत उचित पावले उचलणार असल्याचे आमदार साळकर यांनी सांगितले.
दीपक नाईक यांनी मासळी मार्केटमधील विक्रेत्यांना नवीन मार्केट प्रकल्प पाहिजे असल्याचे सांगितले. त्यांच्या काही समस्या असून त्या दूर करण्यात याव्यात, अशी त्यांची मागणी आहे. वास्कोत विविध ठिकाणी अयोग्य पद्धतीने मासळी विक्री करण्यात येत असल्यामुळे मार्केटमधील मासळी विक्रेत्यांना नुकसान सोसावे लागत आहे. हा प्रकार बंद करण्याची त्या मासळी विक्रेत्यांची मागणी आहे. बेकायदेशीर रित्या मासळी विकणाऱ्यावर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत नाईक यांनी देऊन त्याबाबत आमदार आणि नगराध्यक्षांशी योग्य चर्चा करून उचित पावले उचलणार असल्याचे सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.