वास्को: गतवर्षी येथील अग्निशमन दलाने आग व अन्य घटना धरून एकूण ३५९ ठिकाणी मदत कार्य केले. या सर्व घटनांत सुमारे ३५,१२, ४५९ रुपये किमतीच्या मालमत्तेची हानी झाली तर १,०८, ८६, ९३० रुपये किमतीची मालमत्ता वाचविण्यात जवानांना यश आले.
आगीसंदर्भात १७० घटना घडल्या. १८९ अपघात व जनावरांना वाचविण्यासंदर्भातील घटना होत्या. आगीच्या घटनांत एकही जिवीत हानी झाली नाही. अपघातातील घटनांत तिघांना वाचविण्यात आले. तसेच १९ जनावरांचा जीव वाचविण्यात यश आले.
वास्को अग्निशमन दलाकडे मोठे ३ पाण्याचे बंब आहेत. तसेच ज्या अडगळीच्या ठिकाणी मोठे पाण्याचे बंब जाऊ शकत नाही त्यासाठी ताफ्यात सर्व प्रकारची उपकरणे असलेले छोटे वाहनही ताफ्यात आहे.
वास्को अग्निशमन दलाचे जवान नवीन इमारतीच प्रतीक्षेत आहेत. दहा वर्षांपूर्वी जुनी इमारत मोडकळीस आल्याने ती हटवून त्या ठिकाणी नवी इमारत उभारण्याचे काम मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. सध्या आमदार कृष्णा साळकर यांच्या परिश्रमाने कामाला गती मिळाली आहे.
आगीच्या जास्त घटना लोकांच्या निष्काळजीपणामुळे घडत असतात. बहुतेक आगीच्या घटना जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्या तसेच उपकरणामुळे घडलेल्या आहेत. त्यासाठी लोकांनी जीर्ण झालेल्या वीज वाहिन्या, उपकरणे बदलणे क्रमप्राप्त आहे. तसेच घरातील गॅस सिलिंडर व त्याचे पाइप याची पडताळणी करून घेणे तेवढेच गरजेचे आहे.दिलीप बिचोलकर, वास्को अग्निशमन दलाचे अधिकारी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.