Dabolim Dainik Gomantak
गोवा

Dabolim: दाबोळीतील 'त्या' गाड्यामुळे वाहतुकीला धोका, स्थानिक रहिवाशांत नाराजी; ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याचा दावा

Dabolim traffic risk: विनापरवाना उभा केलेला गाडा वाहतुकीस गंभीर धोका निर्माण करत असून, याबाबत पंचायत कोणतीही कारवाई करत नसल्याने नागरिक व वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: जेसिंतो आयलॅंड, दाबोळी येथील शिला बारजवळ महामार्गालगत एका बिगर गोमंतकीय व्यक्तीने विनापरवाना उभा केलेला गाडा वाहतुकीस गंभीर धोका निर्माण करत असून, याबाबत पंचायत कोणतीही कारवाई करत नसल्याने नागरिक व वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

झरीन ते माटवे-दाबोळीदरम्यान शिला बारजवळ महामार्गाच्या अगदी कडेला प्लास्टिक आवरण घालून टेबल-खुर्च्या मांडून बिनधास्त व्यवसाय सुरू आहे. काही वाहनचालक महामार्गावरच वाहने उभी करून या गाड्यावर थांबत असल्याने मागून येणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक मारावे लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे.

या गाड्याला कोणताही अधिकृत परवाना नसून जीएसटी, पंचायत कर किंवा अन्य कोणताही कर भरलेला नसल्याचे सांगण्यात येते. तरीही हा गाडा गेल्या कित्येक महिन्यांपासून तसाच उभा असून पंचायत प्रशासन यावर कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दाबोळी ग्राम पंचायत क्षेत्रात अवैध गाडे तसेच व्यवसायांना थारा दिला जाऊ नये, असे ग्रामस्थांनी सांगितले.

कारवाईचे स्वागत

महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या बेकायदेशीर गाडे व बांधकामांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिले असतानाही, स्थानिक प्रशासन त्या आदेशांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पंचायत क्षेत्रातील नागरिकांनी केला आहे.

त्यामुळे अशा बेकायदेशीर गाड्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. कोणत्याही स्थितीत वाहतुकीला अडथळा ठरणारे व्यवसाय पंचायत हद्दीत नको,अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT