action against vagrants in Vasco Dainik Gomantak
गोवा

Vasco: बेवारस व्यक्तींवर कारवाई का नाही? वास्कोतील नागरिकांचा प्रश्न; नगरपालिका इमारतीसमोर बस्तान

action against vagrants in Vasco: पदपथांवर झोपणारे, आरडाओरडा करणारे तसेच संपूर्ण पदपथ ताब्यात घेऊन त्याची दुर्दशा करणारे भटके लोक सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: येथील मुरगाव पालिकेच्या प्रशासकीय इमारतीसमोरील पदपथांवर झोपणारे, आरडाओरडा करणारे तसेच संपूर्ण पदपथ ताब्यात घेऊन त्याची दुर्दशा करणारे भटके लोक सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

मच्छरदाणी लावून त्या पदपथावर बिनधास्तपणे झोपणाऱ्या या भटक्या व्यक्तींविरोधात स्थानिक प्रशासन कारवाई का करीत नाही किंवा त्यांच्या निवासाची इतरत्र व्यवस्था का करीत नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

आज मच्छरदाणी लावून झोपणाऱ्यांनी उद्या तेथे तंबू उभारला, तरी आश्चर्य वाटू नये. याप्रकरणी दखल घेताना माजी नगराध्यक्ष शेखर खडपकर यांनी भविष्यात असे चित्र संपूर्ण वास्कोतील पदपथांवर दिसल्यास आश्चर्य वाटू नये, असे म्हटले आहे.

हे भटके लोक पूर्वी मुरगाव पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या व्हरांड्यात झोपत होते. त्यामुळे पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. तत्कालीन मुरगाव मामलेदार कार्यालयातील कर्मचारीही भटक्या लोकांनी केलेल्या अस्वच्छतेमुळे वैतागले होते.

दरम्यान, मुरगाव पालिकेच्या प्रशासकीय इमारतीची दुरुस्ती व नूतनीकरण करताना त्या व्हरांड्याला सर्व बाजूंनी ग्रील्स लावण्यात आल्याने भटक्या लोकांचे तेथे झोपणे, बसणे व वास्तव्य करणे बंद झाले. त्यानंतर त्यांनी समोरील पदपथावरच ठाण मांडले.

पावसाळ्यात ते अन्यत्र आडोसा घेतात. मात्र, पावसाळा संपल्यानंतर ते पुन्हा पदपथावर आपला संसार मांडतात. तेथेच अंघोळ करणे, कपडे वाळत घालणे, चहा बनविणे आदी गोष्टी केल्या जातात. याप्रकरणी अनेकदा आवाज उठवूनही काहीच फायदा झालेला नाही. तेथील पर्यटन टॅक्सीचालकांना या प्रकारांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या भटक्या लोकांना काही सामाजिक संस्थांकडून सकाळचा नाश्ता तसेच दुपारचे व रात्रीचे जेवण दिले जाते. त्यामुळे त्यांपैकी अनेकजण कोणताही रोजगार न करता दिवसभर पदपथावर बसलेले किंवा झोपलेले दिसून येतात.

काही वेळा तेथे मद्यपान करून शिवीगाळ करणे, भांडणे करणे असे प्रकारही घडतात. मात्र, हे नेहमीचेच असल्याचे समजून संबंधित विभागाचे अधिकारी काणाडोळा करीत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे.

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

यापूर्वी तत्कालीन उपनगराध्यक्षा श्रद्धा महाले यांनी पुढाकार घेऊन आजारी व बेघर व्यक्तींना तेथून अनाथाश्रमात हलविले होते. त्यामुळे तेथील भटके लोकही काही काळासाठी तेथून गायब झाले होते. मात्र, काही दिवसांनंतर त्यांनी पुन्हा तेथे बस्तान बसविले. याकडे मुरगाव पालिका, वास्को पोलिस तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.रिकांनी केला आहे.

पदपथ कोणासाठी?

माजी नगराध्यक्ष शेखर खडपकर यांनी पदपथ हा पादचाऱ्यांसाठी असतो की भटक्या लोकांच्या वास्तव्यासाठी, असा प्रश्न उपस्थित केला आहे. सध्या मुरगाव पालिका मंडळ अस्तित्वात नसल्याने पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात काँग्रेसची 'छात्रों की गुंज' मोहीम; पेपरफुटी, बेरोजगारीविरोधात राज्यात जनजागृती

Goa Heavy Rain: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! धावत्या कारवर कोसळले झाड; आई अन् दोन मुले सुखरूप

Goa Heavy Rain: साळ-खोलपेवाडी येथे घरावर कोसळला वृक्ष; दोन लाखांच्या मालमत्तेचे नुकसान, अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

Goa Water Supply: धरणांमधील पाणी वाढवण्‍यावर आता जलसंपदा खात्‍याचे लक्ष; शुद्धीकरणासाठी 'पेयजल'क‍डून नद्यांतील पाण्‍याचा वापर

Borim Bridge: लाखो रुपये खर्च करूनही पहिल्याच पावसात बोरी पुलावर खड्डे; दुरुस्ती कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT