वास्को, राज्यात अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. काँग्रेसने अनुसूचित जमातीबरोबर इतर समाजाचा फक्त राजकीय फायद्यासाठी वापर केल्याचा आरोप मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.
दाबोळी भाजप मंडळातर्फे नवेवाडे येथे आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, जिल्हा पंचायत सदस्य ॲड. अनिता थोरात, चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव, उपसरपंच ऐश्वर्या कोरगावकर, चिकोळणा-बोगमाळोचे सरपंच संकल्प महाले,
दाबोळी भाजप गटाध्यक्ष संदीप सूद, मुरगावचे नगरसेवक विनोद किनळेकर, नगरसेविक श्रद्ध महाले, तुळसीदास पटेकर, दत्ता आगापूरकर, दामू कोचरेकर, कल्पना हरमलकर, तुषार वळवईकर, राजेश शिवलिंगकर, दिगंबर आमोणकर व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी दाबोळीतील मुरगाव पालिकेचे नगरसेवक सुदेश भोसले यांनी आपल्या समर्थकांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नगरसेवक भोसले यांचे पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले.
दरम्यान, नगरसेवक सुदेश भोसले यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केल्याने दाबोळी भाजप मंडळ बळ वाढले आहे. त्यामुळे येथे आता विकासकामांसाठीही नागरिकांचे सहकार्य मिळणार असल्याचे मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.
आता त्यांना संधी मिळणार!
राज्यात अनुसूचित जमातीसाठी काँग्रेस पक्षाने कधीच पुढाकार घेतला नसल्याने हा समाज विविध क्षेत्रात मागे पडला होता. यापुढे गोव्यातील अनेक क्षेत्रात अनुसूचित जमातीचे नागरिक अग्रेसर राहणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
केंद्रीय भाजप सरकारने उज्ज्वला योजना, ‘किसान’ योजना, ‘गरीब’ योजना राबवून एकाप्रकारे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून दिला आहे. दक्षिण गोव्याबरोबर उत्तरेत भाजपचे उमेदवार विजयी होऊन, केंद्रात महत्त्वाची भूमिका बजावतील.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
भाजप हा सर्वसामान्यांचा विचार करणारा पक्ष आहे. देशाबरोबर राज्यात भाजपने अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. काँग्रेस पक्षाने कधीच जनतेच्या कल्याणासाठी पुढाकार घेतला नाही. यामुळे काँग्रेस पक्षावरील जनतेचा विश्वास कमी झाला आहे.
- माविन गुदिन्हो, पंचायत मंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.