vasco : पालिकेचा पुढाकार : मासळी विक्रेत्‍यांना लेखी आश्‍‍वासन देण्‍यास सहमती
vasco : पालिकेचा पुढाकार : मासळी विक्रेत्‍यांना लेखी आश्‍‍वासन देण्‍यास सहमती Dainik Gomantak
गोवा

...अखेर वास्‍कोतील वादावर तात्‍पुरता पडदा

दैनिक गोमन्तक

दाबोळी: वास्कोतील (vasco) पारंपरिक मासळी विक्रेत्यांनी केलेल्या मागण्या मान्‍य करण्‍याबाबत मुरगाव नगरपालिकेने अखेर लेखी आश्वासन देण्यास सहमती दर्शविल्याने वाद तात्पुरता मिटला. फळ विक्रेत्यांना आणि मासे विक्रेत्यांना जुन्या मार्केटमधून हटवण्याचा प्रयत्न पालिका व पोलिसांकडून आज (शुक्रवारी) होणार असल्‍याने याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

शुक्रवारी सकाळी काँग्रेसचे जोश राजू काब्राल वास्कोतील मासळी विक्रेत्‍यांच्‍या मदतीला धावून आले. जोपर्यंत मुरगाव पालिका लेखी आश्वासन देत नाही, तसेच तात्पुरत्‍या शेडमध्ये योग्‍य व्यवस्था करत देत नाही तोपर्यंत मासळी मार्केटमधील महिलांनी व फळ विक्रेत्यांनी जागा न सोडण्याचा सल्ला त्‍यांनी दिला. शुक्रवारी सकाळी वास्को पोलिसांकडून परेड करण्यात आली. वास्को शहरात खारीवाडा तसेच मासळी मार्केटकडे 30 पोलिसांच्या पथकाने फेरफटका मारला व ते निघून गेले. यात महिला पोलिस कॉन्स्टेबलचाही समावेश होता. यावेळी मासळी मार्केटमधील मासळी विक्रेत्यांमध्ये चलबिचल होती.

दुपारी मुरगाव पालिकेत नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये घेण्यात आलेल्या संयुक्त बैठकीत रापोणकारांचो एकवोटचे ओलेन्‍सियो सिमॉईश, किस्तोद डिसोझा तसेच गोंयचो आवाजाचे नेते कॅ.विरियाटो या मासळी विक्रेत्‍यांच्‍या मदतीला धावून आले. यावेळी मासळी विक्रेत्यांनी पुन्हा आपल्या समस्या मुख्याधिकारी जयंत तारी, नगराध्यक्ष दामोदर कासकर यांच्यासमोर मांडल्या. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मार्केट न सोडण्याचा पवित्रा त्‍यांनी घेतला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात आश्वासन मागितले. त्यानुसार त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्याचे लेखी आश्‍‍वासन तीन दिवसांत देण्‍याचे मुख्याधिकाऱ्यांनी मान्य केले. त्यानंतर या वादावर ताप्‍तुरता पडदा पडला.

या आहेत मागण्‍या

वास्कोत नवीन मासळी मार्केट उभारण्याचा विषय गेली पाच वर्षे रखडला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या मासळी मार्केटमधील मासळी विक्रेत्यांनी प्रारंभी अनेक मुद्दे मांडून या मार्केटला विरोध केला होता. मात्र, आमदार कार्लुस आल्मेदा तसेच मुरगाव पालिकेला त्यांच्या समस्या दूर करण्यास मध्यंतरी यश आले होते. मात्र, आता पुन्हा मार्केटमधील मासे विक्रेत्या महिलांनी शहरात होणारी घाऊक मासळी विक्री व इतर विविध ठिकाणी होणारी मासळी विक्री बंद केली तरच स्थलांतर करणार असल्याचे स्पष्ट केले. मासळी मार्केटमधील मासळी विक्रेत्यांनी मागणी केल्‍यानुसार शहर व परिसरात होणारी घाऊक मासळी विक्री तसेच इतरत्र ठिकाणी होणारी मासळी विक्री बंद करण्यासाठी पालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. परंतु जोपर्यंत एकही मासळी विक्रेता मार्केट बाहेर मासळी विकताना दिसणार नाही तोपर्यंत मार्केटमधील मासळी विक्रेत्या महिला मार्केट सोडण्याच्या तयारीत नाहीत.

स्‍थलांतराचा प्रयत्‍न हाणून पाडला

बुधवारी पार पडलेल्या बैठकीनंतर गुरुवारी पालिका अधिकाऱ्यांनी वास्कोतील मार्केट बाहेरील फळविक्रेत्यांना प्रथम गाठले. यावेळी त्यांच्यासोबत पोलिस बंदोबस्‍तही होता. शुक्रवारपर्यंत तात्पुरत्या काळासाठी बांधलेल्या नवीन मार्केटमध्ये स्थलांतर करण्याची सूचना अधिकाऱ्यांनी फळविक्रेत्यांना केली होती. मात्र, फळविक्रेत्यांनी स्थलांतर करण्यास नकार दिला. फळविक्रेत्यांना हटवण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येताच मार्केटमधील मासळी विक्रेत्या महिलांनी यात हस्तक्षेप केला. त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्‍यांनी अधिकारी व पोलिसांना तेथून जाण्यास भाग पाडले. त्यामुळे काही वेळ वातावरण तापले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी!

सोन्या-चांदीने रचला मोठा रेकॉर्ड; सोन्याने पार केला 74 हजारांचा टप्पा!

हिंदुजा बनले ब्रिटनमधील सर्वात ‘श्रीमंत व्यक्ती’, इराणसोबत 60 वर्षे केला व्यवसाय; भारतातही ग्रुपचा मोठा विस्तार!

Damodar Sal Margao: पोलिसांनीच लपवली चोरी? तीन महिन्यांपूर्वी श्री दामबाबच्या अंगावरील दागिने पळवणारा चोरटा अटकेत

Goa Top News: दामोदराच्या सालात चोरी, श्रेया, नमिताला पोलिस कोठडी; राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT