Sarvajanik Shree Ganesh Mandal Dainik Gomantak
गोवा

Ganesh Festival Special: 'ढवळी' गणेशोत्सव मंडळातर्फे विविध कार्यक्रम

Ganesh Festival: फोंड्यातील ढवळी येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यंदा 29व्या गणेशोत्सव सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

दैनिक गोमन्तक

Ponda: ढवळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यंदा 29व्या गणेशोत्सव सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्ष वेदांगी देवेंद्र ढवळीकर यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष अनिल नायर, सहसचिव आदित्य ढवळीकर, खजिनदार अजय सावईकर व समितीचे पदाधिकारी संकेत मुळे उपस्थित होते.

यावेळी विविध समित्यांची निवड करण्यात आली-

* देवकृत्य समिती: देवराज उपाध्ये, वसंत सावईकर, संकेत नाईक मुळे.

* निधी समिती: विवेक ढवळीकर, अमेय नाईक मुळे.

* मंडप समिती: मोनाल मणेरीकर, राजेंद्र मणेरीकर.

* कार्यक्रम समिती: अमोल ढवळीकर, अनुष्का ढवळीकर, पार्थ दळवी, रिया कुंभार, शलाका ढवळीकर, अविनाश नाईक, राधा भांडणकर, पुष्कर नावती, ऋग्वेदा देसाई.

बुधवार दि. 31 रोजी सकाळी 10 वा. श्री गणरायाचे पूजन, गुरुवारी 1 सप्‍टेंबर रोजी सकाळी पूजा, आरती प्रसाद, शुक्रवारी 2 रोजी संध्याकाळी 4.30 वा. श्‍लोक पाठांतर स्पर्धा 6 ते 10 वर्षे वयोगटासाठी तर 11 ते 15 वयोगटासाठी ज्ञान हीच शक्ती व स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या विषयावर वक्तृत्व स्पर्धा होईल. शनिवार 3 रोजी 4 वा. मेंदी स्पर्धा तर संध्‍याकाळी 7 वा. दोन अंकी कोकणी नाटक होईल. रविवार दि. 4 रोजी 5.30 वा. चक्रीकीर्तन होणार आहे.

सोमवारी 5 रोजी सकाळी 9 वा. गणहोम विधी होईल. संध्याकाळी 4 वा. पाककला स्पर्धा तर 6.30 वा. ‘म्युझिकल मी विथ आर्या आंबेकर' (Musical Me with Arya Aambekar) हा सांगीतिक कार्यक्रम होणार आहे. मंगळवार दि. 6 रोजी संध्याकाळी बक्षीस वितरण कार्यक्रम व ढवळी गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव होईल. त्यानंतर दिंडी मिरवणुकीने श्रीचे विसर्जन होईल.

दरम्यान, ढवळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा एकोणतीस वर्षांचे झाले असून युवा महिला कार्यकर्त्या यंदा या गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्ष आहेत. तालुक्यात प्रथमच एका गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्ष महिला आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT