मडगाव: तम्नार प्रकल्प प्रकरणात सीईसीने केलेल्या शिफारसी उचलून धारणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचे नागरी कार्यकर्ते, युवक, बिगरसरकारी संघटना व नागरिक गटांनी स्वागत केले आहे. सदर निवाडा म्हणजे लांबलचक बोगद्यानंतर प्रकाश हा असतोच हे दाखवून देणारा आहे अशा व्यक्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
तीन प्रकल्पांविरोधात आंदोलन छेडणारे स्व. ज्युलिओ सेड्रिक आगियार यांच्या पत्नी सोनिया आगियार म्हणाल्या की, या निवाड्याने ज्युलिओ हे भलतेच खूष झाले असते. या आंदोलनात सहभागी झालेल्या व पर्यावरण रक्षणासाठी सतत लढलेल्या सर्व लढवय्यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे. तर, ‘गोंयचो स्वाभिमान’ पक्षाचे अध्यक्ष स्वप्नेश शेर्लेकर म्हणाले की, ही फक्त सुरूवात आहे. सर्व तिन्ही विध्वंसक प्रकल्प रद्द होतील हे आता पाहणे गरजेचे आहे. भाजप सरकारने याची दखल घ्यावी व लोकेच्छेचा आदर करावा.
फादर बोलमेक्स परेरा म्हणाले, सरकार व त्याचे भांडवलवादी मित्र आमचे भविष्य उजाड करू शकणार नाहीत हे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. चिखली यूथ फार्मस क्लबने आपण आपली जंगले व पुरातन निसर्ग व्यवस्था अबाधित राखण्यासाठी कटिबद्ध रहाणार असल्याचे जाहीर केले आहे.
मोले मेमरी क्लबच्या इवांतिका परेरा म्हणाल्या की, न्यायालयाच्या प्रतिसादाची आपण उत्कंठतेने प्रतीक्षा करत होतो. शेवटी कुणीतरी आमचा आवाज ऐकला हेच खूप झाले. तृणमूल काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष डॉ. जॉर्सन फर्नाडिस यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यामुळे गोव्यातील भाजप सरकारच्या भूमिकेवर ठपका आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.