Vande Bharat Express Dainik Gomantak
गोवा

Vande Bharat Express in Margao: वंदे भारत एक्सप्रेस मडगाव स्थानकावर दाखल; पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा

मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस जास्तीत जास्त 8 तासांत एक्स्प्रेस अंतर कापेल

Rajat Sawant

Vande Bharat Express in Margao: मुंबई-मडगाव-मुंबई रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस 29 मेपासून नियमितपणे सुरू होणार असल्याची माहिती रेल्वेकडून मिळाली होती.

या रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी मडगावहून हिरवा झेंडा दाखवतील अशीही माहिती मिळाली होती. दरम्यान आज मडगावात आठ डब्यांची वंदे भारत ट्रेन दाखल झाली.

मुंबई - मडगाव मार्गावर या रेल्वेची चाचणी पूर्ण झाली होती. मुंबईहून न थांबता आलेल्या या रेल्वेला मडगावमध्ये पोहोचायला केवळ सात तास लागले होते.

मुंबई-मडगाव-मुंबई वंदे भारत रेल्वेचा थांबा कुठल्या कुठल्या रेल्वे स्थानकांवर करावा या विषयीचा निर्णय रेल्वे बोर्ड घेणार आहे.

मुंबईहून यापुर्वी तीन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या सुटत आहेत. त्या मुंबई-गांधीनगर, मुंबई-शिर्डी व मुंबई-सोलापूर अशा आहेत. मुंबईहून सुटणारी ही चौैथी वंदे एक्स्प्रेस आहे. आत्तापर्यंत, देशाला सेमी हाय स्पीड असलेल्या 17 वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्या आहेत. 

मुंबई-मडगाव-मुंबई रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस काही ठराविक रेल्वे स्थानकांवर थांबेल. त्यामुळे जास्तीत जास्त 8 तासांत ही एक्स्प्रेस अंतर कापेल. त्यामुळे प्रवाशांचे चार तास वाचतील. या एक्स्प्रेसची ताशी 180 किमी वेगाने धावण्याची क्षमता आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT