Loksabha Election 2024  Dainik Gomantak
गोवा

Valpoi News : डबल इंजिनच्या ‘पॉवर पॅक’ मुळे लाभेल मतािधक्य ; भाजप नेत्यांना विश्‍वास

गोमन्तक डिजिटल टीम

सपना सामंत

Valpoi News :

वाळपई, सत्तरी तालुक्याचा महत्वाचा मतदार संघ असलेला पर्ये मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरवात दीड वर्षांपूर्वीच झाली आहे.

पर्येच्या आमदार डाॅ. दिव्या राणे या धडाडीच्या आमदार असून अल्पावधीतच त्यांनी सर्वांच्या मनात घर केले आहे. दोन वर्षांपासून त्यांनी पर्ये मतदारसंघात वेगवेगळे प्रकल्प आणले असून हे विकास प्रकल्प मार्गी लावतानाच खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणूक प्रचाराला त्यांनी सुरवात केली आहे.

डबल इंजिनच्या पॉवर पॅक कामांमुळे भाजपला भरघोस मते मिळतील,असा विश्‍वास डॉ.दिव्या राणे यांनी व्यक्त केला आहे.तर कॉंग्रेसने नुकतीच उमेदवारी जाहीर केल्याने खलप समर्थकांत आनंद पसरला आहे. कॉंग्रेसच्या उमेदवारीला उशीर झाल्याने भाजपने प्रचारात आघाडी घेतली आहे.

मतदार संघात कोट्यवधींचे प्रकल्प अस्तित्वात येत आहेत, ते डबल इंजिन सरकारमुळेच त्यामुळे पायाभरणी, उद्‍घाटन आदी कार्यक्रमावेळी मोठ-मोठे नेते पर्ये मतदारसंघात उपस्थित राहात होते. त्यांनी तेव्हापासूनच पक्षाचा मोठा प्रचार सुरू केला आहे. आता औपचारिकरित्या प्रचाराला सुरुवात झाली आहे, तीही मोठ्या प्रमाणात घराघरांत, वाड्यावाड्यांवर, गावागावांत भाजपचा जोरदार प्रचार सुरू आहे. कार्यकर्त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

काॅंग्रेसतर्फे शनिवारी जाहीर होऊन रमाकांत खलपांना उमेदवारी मिळाल्याने कार्यकत्यांमध्ये आनंद पसरला आहे. अद्याप काँग्रेसचा प्रचार उमेदवारीमुळे सुरू झाला नव्हता. आता प्रचाराला लवकरच सुरुवात केली जाईल.पण भाजपने प्रचारात आघाडी घेतल्याने कॉंग्रेसपुढे आव्हान आहे.

रिव्होल्युशनरी गोवन्सचे उत्तर गोव्यातील उमेदवार म्हणून मनोज परब अधून मधून वाळपई मतदार संघात रस्त्यावर उतरताना दिसतात.

पर्ये पूर्वाश्रमीचा कॉंग्रेसचा बालेकिल्ला

२०१९ च्या निवडणुकीत पर्ये मतदारसंघात काॅंग्रेसचे आमदार प्रतापसिंह राणे होते. मात्र, त्याचवेळी विश्वजित राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपच्या बाजूने विश्‍वजित राणे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी वाळपई बरोबर खास पर्ये मतदारसंघात भाजपसाठी प्रचार केला होता.

व भाजपला चांगली मते प्राप्त होऊन उत्तर गोव्यातून पर्ये मतदारसंघात ४० टक्के मतदान झाले होते. मात्र आता भाजपचा आमदार असल्याने भाजपलाच चांगले मते मिळणार आहे.

पर्ये मतदारसंघात गेल्या दोन वर्षात वीज, पाणी, रस्ते आदींचे मोठ मोठे प्रकल्प भाजप सरकारमुळे पूर्ण होऊ शकले. भाजप सरकारच्या विविध योजना प्रत्येक गरजूंपर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

आणि मतदारसंघाचा विकास यापुढेही सुरु राहण्यासाठी भाजप सरकार पुन्हा सत्तेत असणे गरजेचे आहे. आणि सर्वांचे हे स्वप्न पुन्हा साकार होणार आहे. लोकांच्या अपेक्षा ह्या भाजप सरकारमुळेच पूर्ण होत आहेत. त्यामुळे पर्ये मतदारसंघातून मोठे मताधिक्य प्राप्त होईल यात शंका नाही.

-विनोद शिंदे, पर्ये प्रभारी (भाजप)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT