Sindoor Yatra Valpoi Dainik Gomantak
गोवा

Valpoi: देशासाठी एकत्र येण्याची हीच वेळ! ‘सिंदूर यात्रे’त आरोग्यमंत्री राणेंचे प्रतिपादन; वाळपईत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

Sindoor Yatra Valpoi Goa: वाळपईत विश्‍वजित राणे यांच्या नेतृत्वाखाली वाळपई मतदारसंघातील देशप्रेमी नागरिकांच्या सहभागाने भव्य ‘सिंदूर यात्रा’ काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

Sameer Panditrao

वाळपई: पाकने भारतावर वारंवार दहशतवादी हल्ले केले. मात्र यावेळी ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे भारताने दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून ठोस प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साहसी नेतृत्वामुळे हे शक्य झाले. देश रक्षणासाठी एकत्र येण्याची हीच वेळ आहे, असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी आज सांगितले.

ही यात्रा काढणे गरजेचे होते, कारण भारताच्या सशस्त्र दलांच्या शौर्य, बलिदान आणि देशभक्तीला दिलेली ही सलामी आहे,असेही राणे यांनी सांगितले.

वाळपईत आज विश्‍वजित राणे यांच्या नेतृत्वाखाली वाळपई मतदारसंघातील देशप्रेमी नागरिकांच्या सहभागाने भव्य ‘सिंदूर यात्रा’ काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. ही यात्रा आरोग्यमंत्री राणे यांच्या कार्यालयापासून शहीद स्तंभापर्यंत काढण्यात आली. यात शेकडोंच्या संख्येने महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, स्वयंसेवक आणि नागरिकांनी भाग घेतला.

राणे पुढे म्हणाले, पाकिस्तानकडून भारतात सतत अस्थिरता पसरवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. सोशल मीडियावर धर्माधारित फूट पाडणारे व्हिडिओ प्रसारित केले जात आहेत. अशा स्थितीत भारतीयांनी सावध राहणे, संशयास्पद हालचाली विषयी पोलिसांना कळवणे,देशसुरक्षेसाठी एकदिलाने उभे राहणे आवश्यक आहे.

शत्रूंना मोदींनी दिले मर्मभेदी उत्तर

२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा बळी गेला. पाकिस्तानने रचलेल्या या षडयंत्रात निष्पापांचे बळी गेले. त्यामुळे यात्रेदरम्यान महिलांना ‘सिंदूर’ भेट देण्यात आली. यावेळी राणे म्हणाले, जेव्हा सैनिक शहीद होतो, तेव्हा त्याच्या पत्नीचे ‘सिंदूर’ पुसले जाते म्हणून ‘सिंदूर यात्रा’ ही स्त्रीशक्तीच्या त्यागाची आणि देशप्रेमाच्या समर्पणाचे प्रतीक ठरते आणि म्हणून मोहिमेला ‘सिंदूर’ नाव देण्यात आले. आज आपण शहीद सैनिकांच्या पत्नींच्या वेदनेत सहभागी आहोत. पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त करुन मोदींनी मर्मभेदी उत्तर दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT