Valpoi Dainik Gomantak
गोवा

Valpoi News : प्रत्येक हिंदू सणामागे वैज्ञानिक महत्त्व : प्रकाश गाडगीळ

Valpoi News : वाळपईत ‘प्रेरणा’तर्फे वेशभूषा स्पर्धा, सांज पाडवा कार्यक्रम रंगला

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi News :

वाळपई , आपला प्रत्येक हिंदू सण, उत्सवाला विशेष महत्त्व असून सणामागे काही तरी आयुर्वेदिक, वैज्ञानिक महत्त्वही असते. म्हणूनच हिंदू सणांना जागतिक पातळीवरही सकारात्मक नजरेने बघितले जाते. परदेशातही हिंदूंचे सण साजरे केले जातात.

गुढीपाडवा हा हिंदूंच्या वर्षारंभाचा दिवस आहे. या दिवशी उभारली जाणारी गुढी विजयाचे प्रतीक असते. म्हणूनच नव वर्षाची गुढी नेहमीच उंचच उभारली पाहिजे. उंच गुढी नेहमीच प्रेरणा देते, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षक प्रकाश गाडगीळ यांनी केले.

वाळपईत मंगळवारी रात्री प्रेरणा सांस्कृतिक मंडळ, वेळूस यांच्या वतीने आयोजित वेशभूषा स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

सुलभा फातर्फेकर, परीक्षक सगुण गावकर, महादेव गावकर, विजय खांडेकर तसेच मंडळाच्या अध्यक्षा नेहा शिरोडकर यांची उपस्थिती होती. गाडगीळ म्हणाले, ३१ डिसेंबरला धिंगाणा करून आंग्ल नववर्ष साजरे केले जाते. पण गेल्या पंधरा वर्षात राज्यात गुढी पाडवा उत्साहात साजरा केला जात असून हिंदूप्रेमी जागे होत आहेत.

अध्यक्षा नेहा शिरोडकर यांनी प्रास्ताविक केले. विभूती मयेकर हिने मान्यवरांची ओळख, स्वागत केले. मालती मयेकर हिने सूत्रसंचालन केले. वेशभूषा स्पर्धेचे निवेदन प्रिय वेलिंगकरने केले. दीपराज तायशेट्ये यांनी आभार मानले. तुळशीदास मयेकर यांनी स्वागत केले. त्यानंतर स्वामी समर्थ क्रिएशनतर्फे सांज पाडवा या नाट्यगीत, भक्ती गीतांचा सुमधूर कार्यक्रम संपन्न झाला.

वेशभूषा स्पर्धेत सावी गावस प्रथम

गुढी पाडव्यानिमित्त आयोजित वेशभूषा स्पर्धेत प्रथम सावी गावस , व्दितीय आरोही मयेकर, तिसरे आरूष गावडे यांना बक्षिसे प्राप्त झाली. तर उत्तेजनार्थ प्रथम स्वप्नाली गुरव, व्दितीय वरद इब्राम्हपूरकर, तिसरे अन्वी गावडे हिला प्राप्त झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: "हो, माझी गर्लफ्रेंड आहे, तिचं नाव...", वैभव सूर्यवंशी खरंच रिलेशनशिपमध्ये? पोस्ट होतेय व्हायरल, चाहते पडले संभ्रमात

Goa Politics: शिंदेसेना गोव्यात तग धरू शकेल?

Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण! सराफा बाजारात तेजीला ब्रेक; ग्राहकांसाठी सुवर्णसंधी

Maje Driver App: खासगी दुचाकींवर भाडे वाहतूक केल्यास थेट जप्ती! 50 वर्षांवरील मोटारसायकल पायलटांना 'DSSY'चा लाभ; CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

PM मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान; राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांच्याकडून गौरव

SCROLL FOR NEXT