Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Sattari Crime: बंदूक कोणाची? दारूगोळा कोणाचा? वाळपई मृत्यू प्रकरणाबाबत चौकशी सुरु

Valpoi Sattari Crime News: वाळपई पोलिसांनी गुन्हा क्र. ७२/२०२४ अंतर्गत भारतीय शस्त्रास्त्र कायदा, वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ आणि भारतीय दंड संहिता कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Sattari Valpoi Gun Shot Hunting Murder Case

वाळपई: पाटवळ शिकारी हत्‍या प्रकरणी बुधवारी सकाळी उत्तर गोवा पोलिस अधीक्षक, डिचोलीचे पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी वाळपई पोलिस स्थानकात भेट देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी केली. तसेच पाटवळ-सत्तरी येथे घटना झालेल्या ठिकाणी फॉरेन्सिक लॅबच्या पथकांनी जाऊन रक्ताचे नमुने घेतले आहेत. आता बंदूक कोणाची, दारूगोळा कोणाकडून आणला याचीही चौकशी केली जाणार आहे.

वाळपई पोलिसांनी पंचनामा करून समद खानचा मृतदेह शवचिकित्सेसाठी बांबोळी येथे पाठवून दिला आहे. आता शवचिकित्सा अहवाल तसेच फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतर नेमका मृत्यू कसा झाला, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, बुधवारी शवचिकित्सा होऊ शकली नाही. त्यामुळे उद्या गुरुवारी शवचिकित्सा अहवालानंतर पुढील माहिती प्राप्त होईल.

वाळपई पोलिसांनी गुन्हा क्र. ७२/२०२४ अंतर्गत भारतीय शस्त्रास्त्र कायदा, वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ आणि भारतीय दंड संहिता कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे, तसेच उमर बाबू सांगार (३८, चालक) आणि नूर अहमद पटेल (२८, दोघे राहणारे - चिंचमळ-म्हाऊस, वाळपई) तसेच मृत समद खान (नाणूस-वाळपई) यांनी एकत्रितपणे व सामूहिक हेतूने टोयोटा इटीओस कार वापरून बेकायदेशीर शस्त्रे, काडतुसे आणि अन्य दारूगोळ्यासह जंगली प्राण्यांच्या शिकारीसाठी गेले.

या संशयितांनी आपल्या कृत्यामुळे मानव किंवा प्राण्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, याची जाणीव असूनही बेकायदेशीर शस्त्रांचा वापर केला. शिकारीदरम्यान संशयितांनी बेकायदेशीर शस्त्राने गोळीबार केला. ज्यामुळे समद खान गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे संशयितांनी खून न करता झालेल्या मनुष्यवधाचा अपराध केला आहे, असा गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणाचा तपास वाळपई पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक खुशाली नाईक, प्रथमेश नाईक तसेच इतर पोलिस पुढील करत आहेत.

समद होता हुशार व मनमिळावू

१. समद खान हा पेशाने अभियंता होता. त्याने फर्मागुढी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात मॅकेनिकल पदवी प्राप्त केली होती. तो काही दिवस वेर्णा येथे एका खासगी कंपनीत कामाला जात होता.

२. समदचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण वाळपई येथील युनिटी हायस्कूलमध्ये झाले होते. तो हुशार व मनमिळावू स्वभावाचा होता. तो मध्यमवर्गीय कुटुंबातील असून त्याचा मोठा भाऊ परदेशात असतो.

३. समदचे वडील खासगी वाहनचालक आहेत. समदचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने वाळपई भागात खळबळ व्यक्त केली जात आहे. सकाळपासून या प्रकरणाची माहिती सर्वत्र पसरल्यानंतर हितचिंतक, मित्रमंडळींनी पोलिस स्थानकाबाहेर गर्दी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT