Stray Animals Dainik Gomantak
गोवा

Goa Stray Cattles: मोकाट गुरांना वाली कोण? रस्त्यांवरील अपघातांत वाढ; पालिका, पंचायतींचा काणाडोळा

Sattari Valpoi Stray Cattles: पावसाळा सुरू झाल्यानंतर मोकाट गुरांच्या संख्येत वाढ झाली असून रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून ती बसलेली आढळतात. त्यामुळे वाहनचालकांना रात्री जीव मुठीत धरून वाहन हाकावे लागते.

Sameer Panditrao

वाळपई: सत्तरी तालुक्यातील बहुतेक सर्वच सार्वजनिक  रस्त्यांवर  मोठ्या प्रमाणात आढळणारी  मोकाट  गुरे  अपघातांना कारणीभूत ठरू लागली आहेत. लोकांच्या जीवाला धोकादायक ठरणाऱ्या या गुरांचा संबंधित प्रशासनाने बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

आता पावसाळा सुरू झाल्यानंतर मोकाट गुरांच्या संख्येत वाढ झाली असून सर्वच भागांत रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून ती बसलेली आढळतात. त्यामुळे वाहनचालकांना विशेषत: रात्री जीव मुठीत  धरून वाहन हाकावे लागते. रात्रीच्या वेळी ही गुरे रस्त्यावर कळपाने बसलेली असतात. सध्या पावसाचे दिवस असल्याने रस्त्यावर बसलेल्या गुरांचा अंदाज येत नाही. ग्रामीण भागांतील रस्त्यांवर मुळात दिव्यांचा अभाव असतो. अशावेळी ही गुरे अपघातास कारणीभूत ठरतात.

 वाळपई शहरात तर रात्रीच्या वेळी गुरेच गुरे दिसू लागली आहे. वाळपई-ठाणे मार्गावर अनेक ठिकाणी कळपाने रस्त्याच्या मधोमध गुरे बसलेली दिसतात. शहरांसह ग्रामीण भागातही हीच स्थिती आहे. काल ठाणे येथे पिंपळाच्या झाडाखाली पार्क करून ठेवलेल्या दुचाकी गुरांनी पाडून तिचे नुकसान केले. तसेच रस्त्यावर पडलेल्या शेणावरून घसरून तिघेजण पडल्याची घटना घडली.  याबाबत स्थानिक पंचायत किंवा नगरपालिकांनी अशा गुरांवर कारवाई करण्याची गरज आहे. मालकांनी आपली गुरे स्वत: सांभाळावीत किंवा संबंधितांनी  रस्त्यावर फिरणारी गुरे गोशाळेत पाठवावीत.

मालक असूनही जनावरे बेवारस

रस्त्यावर बसणाऱ्या अनेक गुरांच्या कानाला बिल्ला असल्याने या गुरांचा मालक कोण हे समजते. मात्र, मालक असूनसुद्धा ती मोकाट व बेवारसपणे फिरत असतात. त्यांच्या रोजच्या कटकटीमुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहे.    अनेक वेळा ही गुरे रस्त्याच्या बाजूला उभी केलेली वाहने विशेषत: मोटारसायकल, स्कूटर पाडून त्यांचे नुकसान करतात.

वाहतूक कोंडी; अपघातांना आमंत्रण

ही गुरे रस्त्यावरच ठाण मांडून बसत असल्याने सर्व गुरांचे शेण रस्त्यावर पसरते. पावसाच्या पाण्याने ते वाहून सर्वत्र पसरते. त्याचबरोबर शेणामुळे रस्ते सुळसुळीत होऊन वाहनचालक घसरून पडतात. अनेक वेळा या गुरांमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडीही होते. बऱ्याचवेळा हॉर्न वाजवूनही ही गुरे रस्त्यावरून हलत नाहीत. चालक वा क्लिनरला गाडीतून उतरून गुरांना हाकलावे लागते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Paper Leak Issue: विद्यापीठातील प्रश्‍नपत्रिकांची चोरी उघड; चौकशी समितीचा भौतिकशास्त्राचे प्राध्यापक, डीन, रजिस्ट्रार, कुलगुरूंवर ठपका

Rashi Bhavishya 17 July 2025: प्रवासाचे योग, प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील; मान-सन्मान वाढेल

Delhi Goa Flight: विमानात तांत्रिक बिघाड; दिल्लीतून गोव्याला येत असलेले विमान मुंबईला वळवले

पावसाळी अधिवेशनापूर्वी आमदार विजय सरदेसाई अडचणीत; सभापती तवडकरांबाबत जातीय वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिस तक्रार

Israel Syria Attack: दमास्कसमधील 'ड्रोन हल्ला' लाइव्ह! स्फोट होताच टीव्ही अँकरची उडाली भंबेरी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT