वाळपई: वाळपई नगरपालिका क्षेत्रातील वेळूस ते सोनाळ-तिस्कपर्यंत रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तब्बल दोन वर्षांनंतर या रस्त्याच्या हॉटमिक्सचे काम केले आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
वाळपई कदंब बसस्थानक ते सोनाळ-तिस्कपर्यंत रस्त्याचे हॉटमिक्स काम करण्यात आले आहे. त्यासाठी वाळपईचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे योगदान लाभले आहे. दळणवळणाच्या बाबतीत चांगले काम करण्यात आले आहे.
दोन वर्षांअगोदरपासून रस्ता खराब झाला होता. तसेच वेळूस गावातील नगरगाव मार्गावरील मुख्य रस्त्यालगत जेसीबी यंत्रणेने चर खोदून वीज केबल घालण्याची कामे करण्यात आली होती. त्यानंतर रस्ता पूर्ववत करण्यास सरकारला मुहूर्त भेटत नव्हता. या मार्गे जाताना वाहनचालकांना मोठा त्रास होत होता.
पावसाळ्यात तर चिखलामुळे लोकांना खूपच बिकट स्थितीला सामोरे जावे लागले होते. चर खोदून तसेच ठेवल्याने दुचाकीचालकांना त्रासदायक ठरत होते. त्यानंतर या ठिकाणी गटार बांधणीची कामेही करण्यात आली. अखेर तब्बल दोन वर्षांनंतर या वेळूस भागात हॉटमिक्स रस्ता काम करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी सरकारचे आभार मानले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.