Illegal Beef Trafficing Dainik Gomantak
गोवा

Illegal Beef Trafficing: चोर्ला घाटात मध्यरात्री थरार! पाच गायींच्या मांसासह दोन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात; 20 वर्षीय तरुणाला बेड्या

Valpoi Police Action: गोव्याच्या सीमावर्ती भागात वाळपई पोलिसांनी शनिवारी (31 जानेवारी) एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली.

Manish Jadhav

Valpoi Police Action: गोव्याच्या सीमावर्ती भागात वाळपई पोलिसांनी शनिवारी (31 जानेवारी) एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली. सत्तरी तालुक्यातील चोर्ला घाटात पोलिसांनी बेकायदेशीर गोमांसाची मोठी तस्करी उघडकीस आणली असून याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले.

कर्नाटक राज्यातील बेळगावहून गोव्याच्या दिशेने काही आलिशान गाड्यांमधून बेकायदेशीररीत्या मांसाची वाहतूक केली जात असल्याची खात्रीशीर आणि गुप्त माहिती वाळपई पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक विद्देश शिरोडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चोर्ला घाटात सापळा रचला आणि संशयास्पदरीत्या येणाऱ्या दोन 'इनोव्हा' गाड्यांना अडवून त्यांची कसून झडती घेतली.

या झडतीदरम्यान पोलिसांना दोन्ही गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मांस साठवून ठेवलेले आढळले. प्राथमिक तपासणी आणि अंदाजानुसार, हे मांस सुमारे पाच गायींचे असावे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. या तस्करी प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरुन दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यापैकी एकाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव इरफान मेहबूब सौनशूर (वय 20 वर्ष) असून तो साखळी येथील कारापूर तिस्क भागातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दोन्ही वाहने आणि जप्त केलेले मांस ताब्यात घेऊन जप्तीचा पंचनामा केला आहे.

ही संपूर्ण कारवाई अत्यंत गुप्तता पाळून करण्यात आली, ज्यामुळे तस्करांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही. चोर्ला घाट हा मार्ग गोवा (Goa) आणि कर्नाटकला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने या मार्गावरुन अनेकदा बेकायदेशीर वस्तूंची वाहतूक होत असते, मात्र वाळपई पोलिसांच्या या सतर्कतेमुळे एक मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस निरीक्षक विद्देश शिरोडकर यांनी सांगितले की, या बेकायदेशीर व्यापारामागे नेमके कोणाचे हात आहेत आणि हे मांस गोव्यात नक्की कोणाकडे पाठवले जात होते, याचा सखोल तपास आता सुरु करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बेकायदेशीर मांस विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून सीमावर्ती भागात पोलिसांचा बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आह

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cigarette Price Hike 2026: सिगारेटचा झुरका आता महागला, पण बिडी झाली स्वस्त! अर्थमंत्र्यांनी टॅक्स स्ट्रक्चरच बदललं

Union Budget 2026: मच्छिमारांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा! खोल समुद्रातील मासेमारीसाठी दिली सवलत; हटवले सगळे अडथळे

Budget 2026: काय स्वस्त झाले, काय महाग? अर्थसंकल्पातील मोठे बदल पहा एका क्लिकवर..

शिक्षण क्षेत्रासाठी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! आता प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतीगृह, 15 हजार शाळांमध्ये 'कंटेंट क्रिएटर लॅब' उभारले जाणार

Budget 2026: अर्थसंकल्प 2026 मधून शेतकऱ्यांच्या पदरात काय पडले? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केल्या 'या' घोषणा

SCROLL FOR NEXT