Valpoi Police Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: चोर्ला घाटात सापडला मद्यसाठा! वाळपई पोलिसांची कारवाई; 24 हजारांची दारु जप्त

Chorla Ghat Raid: वाळपई पोलिसांना चोर्ला घाटातील रस्त्याच्या कडेला संशयास्पद वस्तू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली.

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi Police Find Liquor and Feni in Chorla Ghat During Raid

वाळपई: वाळपई पोलिसांना चोर्ला घाटातील रस्त्याच्या कडेला संशयास्पद वस्तू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली.

या मोहिमेत रस्त्यालगतच्या झुडपांत मद्याच्या बाटल्यांचे दोन बॉक्स आणि काजू फेणीच्या दोन मोठ्या कॅन्स सापडल्या त्याची एकुण किंमत 24 हजार रुपये असल्याचे समजते.

ओल्ड मॉंक XXX रमच्या दोन बॉक्समध्ये एकूण ४९ बाटल्या आढळल्या, ज्यांची किंमत सुमारे १०हजार रुपये आहे. स्थानिक काजू फेणीच्या सुमारे ७० लिटरच्या दोन मोठ्या कॅन्सदेखील सापडल्या, ज्यांची अंदाजे किंमत १४ हजार रुपये आहे.

या संपूर्ण साठ्याची अंदाजे किंमत २४ हजार रुपये आहे.पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू असून, मद्याचा हा साठा कोणी सोडला आणि कुठे पाठवण्याचा हेतू होता, याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून संपूर्ण मद्यसाठा जप्त केला. अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkani Song Viral: ''मणगणे खातो मणगणे'' कनमाणी गाण्याचं कोकणी व्हर्जन व्हायरल; पहा Video

Online Food Ordering Platforms: Zomato, Swiggy वरून जेवण ऑर्डर करणं महाग, कोणतं प्लॅटफॉर्म देतंय स्वस्त डिलिव्हरी सेवा? जाणून घ्या

Zimbabwe vs Sri Lanka: सिकंदर रजाचा 'डबल धमाका'! श्रीलंकेला पराभवाची धूळ चारत केली मोठी कामगिरी; SKY आणि सेहवागला सोडले मागे

Viral Video: मेट्रोतील 'इन्स्टा' वेड! 'बॅटमॅन' बनून रिल करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'एवढी ताकद अभ्यासात लावली असती तर...'

Japan PM Resign: जपानमध्ये मोठी राजकीय उलथापालथ! पंतप्रधान शिगेरू इशिबा यांची राजीनाम्याची घोषणा, कारण काय?

SCROLL FOR NEXT