Goa illegal meat trade Dainik Gomantak
गोवा

Beef Smuggling: रात्रीच्या अंधारात तस्करी, वाळपई पोलिसांनी केरीत उधळला डाव; बेकायदेशीर गोमांसाचा मोठा साठा जप्त

Beef Transport Raid Goa: वाळपई पोलिसांनी देखील धडक कारवाई करत केरी तपासणी नाक्यावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गोमांस जप्त केले

Akshata Chhatre

वाळपई: गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी गोमांसाच्या तस्करीवर कारवाई होत आहे. अशातच वाळपई पोलिसांनी देखील धडक कारवाई करत केरी तपासणी नाक्यावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गोमांस जप्त केले आहे. वाळपई पोलिसांच्या या कारवाईचे सगळीकडून कौतुक होत आहे.

गुरुवारी (दि.१५) रात्री १.३० च्या सुमारास केरी तपासणी नाक्यावर केए ४८ एम १११७ या सफेद रंगाच्या वाहनाची चोकशी केली असता गाडीत मोठ्या प्रमाणात गोमांस सापडले. यासोबतच गाडी चालकांजवळ कोणत्याही प्रकारचे कायदेशीर कागदपत्र आढळले नाहीत, त्यामुळे वाहतूक केली जात असलेले गोमांस बेकायदेशीर असल्याची पोलिसांना खात्री पटली.

५०० किलोहून अधिक गोमांस जप्त

ही बेकायदेशीर वाहतूक बेळगावहून मडगाव येथे केली जात होती. वाळपई पोलिसांनी धडक कारवाई करत वाहन ताब्यात घेतले असून बेकायदेशीर गोमांस वाहतूक करत असल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करत वसीम आदमसाब होंगल व सुहैल अहमद एस अत्तर (रा. कर्नाटक) यांना अटक करण्यात आली आहे.

या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गोमांस जप्त करण्यात आलेय. ५०० किलोहून अधिक जप्त केलेल्या या गोमांसाची किंमत एक ते दीड लाख रुपये आहे.

दरम्यान, पशुवैद्यकीय डॉक्टरांनी पंचनामा करत गोमासाची तपासणी केली आहे व अहवाल पोलिसांना सादर केला आहे. या प्रकरणाचा तपास वाळपई पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक खुशाली नाईक करत आहेत.

वाळपईत 750 किलो बेकायदा गोमांस जप्त

यापूर्वी देखील वाळपई पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने धडक कारवाई करत ७५० किलो बेकायदा गोमांस जप्त केले होते. त्या जप्त केलेल्या गोमांसाची एकूण किंमत सुमारे ३ लाख रुपये असून पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: मँचेस्टरमध्ये यशस्वी जयस्वालचा नवा इतिहास! 50 वर्षांनंतर ओल्ड ट्रॅफर्डवर घडवला 'हा' पराक्रम

Mobile Addiction: स्मार्टफोनमध्ये कॅमेरा आला, 'कोडॅक' नावाची कंपनी धोक्यात आली; मोबाइल नावाचा 'ब्रह्मराक्षस'

Video: 'ढवळीकर झोपले त्यांना जागे करा'; मुख्यमंत्री कुसुमाग्रजांची कविता सादर करताना युरींची मिश्किल टिपण्णी अन् सभागृहात हशा पिकला

Goa Assembly Session: गोव्यात आता रॉटवेलर, पिटबुलला 'नो एन्ट्री'! विधानसभेत विधेयक संमत, बंदीचा मार्ग मोकळा

Goa Assembly Session: 'गोवा दावे मूल्यांकन विधेयक, 2025' विधानसभेत संमत; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT