Illegal Beef Trafficking: केरी-सत्तरी चेकपोस्टवर 300 किलो बेकायदेशीर गोमांस जप्त, गोवा पोलिसांची मोठी कारवाई!

Goa Police Seize 300 KG Beef: गोवा पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली. सत्तरीतील केरी चेकपोस्टवर पोलिसांनी तब्बल 300 किलो बेकायदेशीर गोमांस जप्त केले.
Goa Police Seize 300 KG Beef
Goa Police Seize 300 KG BeefDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Police Seize 300 Kg Illegal Beef at Keri Sattari Checkpost

सत्तरी: राज्यात गेल्या काही दिवसांत गोवा पोलिसांनी धडक कारवाया करत मोठ्याप्रमाणावर बेकायदेशीर गोमांस जप्त केले आहे. यातच आज (16 मार्च) गोवा पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली. सत्तरीतील केरी चेकपोस्टवर पोलिसांनी तब्बल 300 किलो बेकायदेशीर गोमांस जप्त केले.

300 किलो बेकायदेशीर गोमांस जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना सत्तरीतील केरी चेकपोस्टवर दोन कारमधून गोमांसाची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत 300 किलो बेकायदेशीर गोमांस जप्त केले. जप्त केलेल्या गोमांसची किंमत साधारणपणे दीड लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. पोलिस उपअधिक्षक जिवबा दळवी आणि वाळपईचे पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरु आहे.

Goa Police Seize 300 KG Beef
Child Trafficking: धक्कादायक! सांगलीच्‍या 2 वर्षीय मुलीची गोव्‍यात 4.5 लाखांना विक्री, बेळगाव पोलिसांनी केला रॅकेटचा पर्दाफाश

बेकायदेशीर गोमांस वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई

काही दिवसांपूर्वी, केरी चेकपोस्टवरच एका बेकायदेशीर गोमांस वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली होती. बेळगावहून गोव्याच्या दिशेने सय्यद इस्माईल मरचोनी (रा. पेडणे) हा टेम्पो घेऊन (जीए-09-06 यु 6352) केरी चेकपोस्टवर आला असता पोलिसांनी त्याला अटक केली होती. पोलिस तपासादरम्यान त्याच्याकडे मांस वाहन परवाना नसल्याचेही उघड झाले होते. या संदर्भात बेळगावहून गोव्याच्या (Goa) दिशेने गोमांसाची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सय्यद याच्या मुसक्या आवळल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com