Valpoi Navodaya compound wall construction Dainik Gomantak
गोवा

Valpoi: 'वाळपई नवोदय'च्या कुंपणाचे काम सुरू, 3.37 कोटींचा खर्च अपेक्षित; पालकांच्या न्यायालयीन लढ्याला मोठे यश

Valpoi Navodaya compound wall construction: वाळपई मासोर्डे येथील उत्तर गोवा विभागाचे केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयाच्या कुंपणाच्या कामाला अखेर शुभारंभ करण्यात आला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

वाळपई: वाळपई मासोर्डे येथील उत्तर गोवा विभागाचे केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयाच्या कुंपणाच्या कामाला अखेर शुभारंभ करण्यात आला आहे. प्राथमिक स्तरावर जुने असलेले कुंपण जेसीबीद्वारे पाडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ते काम पूर्ण झाल्यावर नवीन कुंपणाचे काम प्रत्यक्षात सुरू केले जाणार आहे. त्यासाठी ३ कोटी ३७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती याचिकादार सुबोध देसाई यांनी दिली.

सुमारे १४०७ मीटर लांबीचे हे कुंपण बांधण्यात येईल. व पुढील बारा ते तेरा महिन्यात काम पूर्ण होईल. कुंपणाची प्रचंड दुरवस्था झाली होती. त्यामुळे विद्यार्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनलेला होता. त्याची जाणीव ठेऊन विद्यालयाच्या पालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात याचिका दाखल केली होती.

पालक सुबोध देसाई, युवराज मळीक, प्रवीण सावंत, किशोर कांबळे, परशुराम राठोड आदींसह ४०० हून पालकांनी पुढाकार घेत हा कुंपण दुरुस्तीचा विषय उच्च न्यायालयात पोहचविला होता. यावर सुनावणी होऊन न्यायालयाने कुंपण बांधणीसाठी प्रक्रिया करावी असे म्हटले होते.

त्याचे पालन करीत जवाहर नवोदय विद्यालय समितीने पुढाकार घेतला. विद्यालयाचे कुंपण अनेक ठिकाणी मोडलेले आहे. या भागात रानटी प्राण्यांचा संचार वाढलेला आहे. व त्यामुळे विद्यार्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न बनला आहे. जमिन मालकीचा प्रश्न आजही प्रलंबित असून मालकी विषय एैरणीचा व रखडलेला विषय बनलेला आहे. त्यामुळे कुंपणाचे काम करता येत नव्हते. या संबंधी पालकांनी चिंता व्यक्त केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची 'चांदी'! एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मिळणार गूड न्यूज; 8व्या वेतन आयोगाबाबत आली अपडेट

Horoscope April 2026: मंगळाची कमकुवत स्थिती अन् कुंभ राशीची कसोटी; नोकरीत वाढणार कामाचा ताण, व्यवसायातही सावधगिरीचा इशारा

Pakistan Economic Crisis: आर्थिक त्सुनामीनं पाकड्यांच्या उडाल्या चिंधड्या! युएईनं 2 अब्ज डॉलर्सचं कर्ज मागितलं परत; पाकिस्तानच्या खजिन्याला पडलं खिंडार

"रागाच्या भरात दिली होती तक्रार", सख्ख्या बहिणीची साक्ष फिरली, विनयभंगाच्या आरोपातून संशयित भावाची निर्दोष मुक्तता

Goa Drug Case: गोव्यातील 'नाईट पार्टी' ठरली अखेरची! इंदूरच्या 21 वर्षीय तरुणाचा हणजूणमध्ये संशयास्पद मृत्यू; ड्रग्जचा ओव्हरडोस? तपास सुरु

SCROLL FOR NEXT