Valpoi Illegal Construction Dainik Gomantak
गोवा

Valpoi : वाळपई नगरपालिकेची बेकायदेशीर बांधकामाविरुद्ध धडक कारवाई

वाळपई नगरपालिकेने बेकायदेशीर बांधकाम ताेडले.

दैनिक गोमन्तक

Valpoi : वाळपई नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग 2 मधील वेळूस वाळपई ठाणे रोड येथील मुख्य रस्त्याच्या बाजुला असलेल्या शेख दाऊद यांनी बेकायदेशीर रित्या बांधकाम केलेल्या इमारत वजा गाळ्यांचे आज वाळपई नगरपालिकातर्फे कारवाई करत जेसीपीच्या सहाय्याने बांधकाम पाडले आहे. वाळपईत अश्या प्रकारे पहिल्यांच बांधकाम पाडण्याची घटना घडली आहे.

यासंबंधी सविस्तर वृत्त असे की वाळपई प्रभाग 2 मध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले होते. याची तक्रार 2017 साली मुबारक अली खान यांनी शेख दाऊद याच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती.

त्यानंतर सदर खटला न्यायालयात सुरु होता. त्याचीच दखल घेत उच्च न्यायालयाने निकाल देत बेकायदेशीर रित्या बांधकाम पाडण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर आज मंगळवार सकाळपासुन बांधकाम पाडण्यासाठी वाळपई नगरपालिका, सत्तरी मामलेदार व इतरांची उपस्थिती होती.

बांधकाम पाडण्यासाठी आलेली जेसीपी नादुरुस्त झाल्याने दुसरी जेसीपी दुपारी 2 वाजता आल्यानंतर बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर सर्व बांधकाम टप्याटप्याने पाडण्यात आले.

यावेळी सत्तरी मामलेदार दशरथ गावस, नगरपालिका मुख्यअधिकारी सुर्याजीराव राणे, नगरपालिका अभियंता जयेश कळंगुटकर, नगरपालिका कर्मचारी, वाळपई पोलिस तसेच इतरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आले.

आतापर्यंतच्या कालखंडात वाळपई अश्या प्रकारचे बांधकाम पहिल्यांदाच पाडण्यात आले आहे. त्यामुळे आज झालेल्या कारवाईनंतर वाळपई भागात खळबळ उडाली आहे. तसेच टप्याटप्याने नगरपालिका क्षेत्रात असलेले बेकायदेशीर बांधकामे असुन तिच्यावर सुध्दा कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना नगरपालिका मुख्याधिकारी सुर्याजीराव राणे म्हणाले, हा आदेश उच्च न्यायालयाचा असुन त्यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. शेख दाउद यांना बांधकाम करताना वाळपई नगरपालिकेची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. तसेच मुबारक अली खान यांना बेकायदेशीर बांधकामाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे आज ह्या निकालामुळेच ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

Assembly Election: जनगणना डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीत निवडणूक! केंद्राच्या आदेशाने गोवा विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा

IND vs PAK: टीम इंडियाकडून लाजीरवाणा पराभव होऊनही मस्ती उतरेना! पाकिस्तानचा कोच म्हणतोय, 'आम्हीच बेस्ट'; आशिया कप जिंकण्याचा दावा Watch Video

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

SCROLL FOR NEXT