Valpoi  Dainik Gomantak
गोवा

Valpoi News : वाळपई परिसरात टप्प्याटप्प्याने कामे होणार; खोदकामाचा वाहनचालकांना त्रास

Valpoi News : गटार व्यवस्था सुरळीत भूमिगत वीजवाहिन्यांसाठीच्या

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi News :

वाळपई, नगरपालिका क्षेत्रात पावसाळापूर्व कामांना सुरवात झाली असून ती टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील, अशी माहिती मिळाली आहे.

वाळपईत गटार व्यवस्था सुरळीत आहे. आवश्यक असलेल्या जागी गटाराचे बांधकाम करण्यात येणार आहे. सध्या प्रभाग १ मध्ये गटार साफ करण्याचे काम सुरू झालेले आहे. त्याचबरोबर इतर प्रभागांत टप्प्याटप्प्याने कामे पूर्ण केली जाणार आहेत. वाळपई नगरपालिकेतर्फे रोजच्या रोज घराघरांतून त्याचबरोबर व्यावसायिक कचरा उचलला जातो, त्यामुळे कुठेही कचरा सांडलेला दिसत नाही.

सध्या वाळपई शहरात विविध भागात भूमिगत वीजवाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी काम पूर्ण झालेले आहे. मात्र, ज्या ठिकाणी काम पूर्ण झालेले आहे, त्यातील माती साफ केलेली नाही.

या मातीमुळे रस्त्यावर माती येण्याचा प्रकार सातत्याने होत असतो. त्याचबरोबर धूळ प्रदूषणही वाढले आहे. वाहनचालकांना याचा त्रास वारंवार सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी गटारावरील लाद्या फुटलेल्या आहेत त्या नवीन घालण्यात येणार आहेत.

वाळपई-ठाणे रोड, वाळपई-नगरगाव, दाबोस आदी मार्गावर मोठ्या प्रमाणात ही माती तशीच पडून आहे. खोदकामामुळे रस्ते खराब झालेले आहेत. तर काही ठिकाणी गटारच गायब झालेले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ही समस्या दूर करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

नदी, नाल्यांची सफाई शेवटच्या टप्प्यात

वाळपई नगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रभागांतील पावसाळापूर्व कामे लवकर पूर्ण केली जाणार आहेत. नदी, नाले यांची सफाई शेवटी केली जाणार आहे. सर्व प्रभागांत गटार व्यवस्था सुरळीत आहे.

त्याचबरोबर ज्या ठिकाणी आवश्यक असेल तिथे बांधकाम केले जाणार आहे. काही भागात भूमिगत वीजवाहिनी घालण्याचे काम सुरू असून त्याची माती रस्त्यावर आलेली आहे. जर संबंधित खात्याने ती काढली नाही तर आम्ही ती साफ करू, असे नगराध्यक्ष प्रसन्ना गावस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

Opinion: प्लेटो दाखवून देतो, ‘लोकशाही’ शहाणपणापेक्षा ‘लोकप्रिय’ मताला प्राधान्य देऊन, हुकूमशाहीचा मार्ग सुकर करते

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

SCROLL FOR NEXT