Valpoi
Valpoi  Dainik Gomantak
गोवा

Valpoi News : वाळपई -वेळूस रस्त्यावर चिखल; चालकांची त्रेधातिरपीट

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi News :

वाळपई-नगरगाव मुख्य रस्त्यावर वेळूस येथे वीज विभागाने मुख्य रस्ता मधोमध खोदून भूमिगत वीज वाहिनी जानेवारीत घातलेली होती. पण ते काम पूर्ण झाल्यानंतर मुख्य रस्त्याचे पूर्ववत डांबरीकरण केले पाहिजे होते.

तसे न केल्याने वाहन चालकांना अक्षरश: चिखलातून वाट काढत जावे लागते आहे. दुचाकीस्वारांची तर तारेवरची कसरत होत आहे.

वेळूस येथे हा मुख्य हॉटमिक्स रस्ता मधोमध जेसीबीने खोदून त्यानंतर जमिनीत वीज वाहिनी घातलेली होती. या काळात काम पूर्ण होऊनही सदर रस्त्यावरील चर नीट बुजवून त्या ठिकाणी काँक्रीट किंवा डांबरी रस्ता केला पाहिजे होता. वीज खात्याने हा खोदलेला रस्ता समतल करणे आवश्यक होते.

त्यानंतरच रस्ता विभाग पुढील कार्यवाही म्हणून रस्ता करणार होते. पण अजूनही खोदलेला रस्ता दुरुस्त केलेला नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांना या भागातून जाताना त्रास सोसावा लागतो. हा मुख्य रस्ता असून मधूनच खणल्याने रस्ता अरुंद झाल्याने एकेरी वाहतून करावी लागत आहे.

समोरून वाहन येताना एका वाहन चालकाला तरी गाडी खोदलेल्या रस्त्यातून घालावी लागते. त्यामुळे अपघाताची भीती वाढली आहे. रस्त्यालगतचे व्यावसायिक तसेच स्थानिक रहिवाशांना या चिखलमय रस्त्याचा प्रचंड त्रास होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Goa: म्हापशात 510 किलो पनीरसह कांदा जप्त; एफडीएकडून दुसऱ्यांदा कारवाई

Goa Crime: कौटुंबिक वादातून महिलेने उचललं मोठ पाऊल; पोटच्या मुलांना फिनाईल पाजत केला आत्महत्येचा प्रयत्न

Mormugao Sada: सडा परिसरात लवकरच उभे राहणार प्राथमिक आरोग्य केंद्र; मुख्यमंत्री सावंत

FC Goa: नुवेच्या रॉलिन बोर्जिस याच्याशी एफसी गोवाचा कायमस्वरुपी करार, अनुभवाचा होणार फायदा

Goa Today's Live News: गोव्याच्या विनाशावर भाजपचे मौन; युरी आलेमाव

SCROLL FOR NEXT