Valpoi News Dainik Gomantak
गोवा

Valpoi News: "सत्तरी ही देवभूमी; शिवरायांकडून प्रेरणा घेऊन 2026 पर्यंत चित्र बदलणार, वाळपईत वॉटर-वे तयार करणार"

Vishwajeet Rane: वाळपईत नविन पंचधातुच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले

Akshata Chhatre

वाळपई: सत्तरी ही देवभूमी असून शिवाजी महाराजांची प्रेरणा प्रत्येकानी घेतली पाहिजे असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी वाळपई छत्रपती शिवाजी महाराज पालीका उद्यानात शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजीत करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवात अध्यक्षस्थानी बोलताना केले.

विश्वजित राणे व आमदार डाॅ. देविया राणे यांच्या हस्ते नविन पंचधातुच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, तसेच करोडो रुपये खर्च करुन सुशोभिकरण करण्यात आलेल्या पालिका उद्यानाचेही थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमींची उपस्थिती होती.

सत्तरीतील विद्यालयांसाठी आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेतील बक्षिसे ही वितरीत करण्यात आली. यावेळी पुणे येथील पोवाड्याचा सांस्कृतिक कार्यक्रम ही संपन्न झाला आणि मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुजा करुन आदरांजली वाहिली.

छत्रपती शिवजी महाराज म्हणजे आदर्श!

वाळपईचे आमदार आणि आरोग्यमंत्री यांनी १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना छत्रपती शिवजी महाराज हे सर्वांचे आदर्श असल्याचे वक्तव्य केले, आणि ते आदर्श आहेत कारण ते कायम सर्वांना सोबत घेऊन कार्यरत राहिले.

वाळपईत केवळ हे उद्यानच नाही तर आणखीन प्रकल्प देखील उभे राहणार आहेत, वर्ष २०२६ पर्यंत वाळपईचे चित्र बदललेलं असेल. लहानमुलांपासून ते महिलांपर्यंत विकासकाम जाईल असे राणे म्हणालेत . वाळपईमध्ये छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊनच एक वॉटरवे तयार केला जाणार आहे आणि लोकांचा विकास हेच ध्येय असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT