Valpoi News: जखमी गुरांना मदत करण्यासाठी केवळ एक नंबर डाईल करा; राज्यभरात गोसंवर्धन केंद्र राबवतंय विशेष उपक्रम

Cattle Road Accident Goa: वाळपईमधल्या गोसंवर्धन केंद्राने उपचार मोबाईल वाहन व्यवस्था तयार केली आहे
Goa Road Accidents
Goa Road AccidentsDainik Gomantak
Published on
Updated on

mobile veterinary service

वाळपई: रस्त्याच्या मधोमध बसलेल्या गुरांमुळे अनेकवेळा येणाऱ्या-जाणाऱ्यांना त्रास होतो. रस्त्याच्या मधोमध असलेल्या गुरांमुळे अनेकवेळा अपघात देखील घडले आहेत आणि यामध्ये अनेक गुरांनी जीव गमावला आहे, यावर उपाय म्हणून वाळपईमधल्या गोसंवर्धन केंद्राने उपचार मोबाईल वाहन व्यवस्था तयार केली आहे.

या उपचार मोबाईल वाहनाच्या मदतीने जखमी गुरांना उपचार करण्यात गोशाळेत घेऊन गेले जाणार आहे. अधिकाधिक गुरांना यामुळे उपचार मिळावेत म्हणून केंद्राकडून एक खास फोन नंबर देखील जारी करण्यात आला आहे.

Goa Road Accidents
Goa Cattle Subsidy Scheme: देशी गाईंच्या योजनेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद; महत्त्वाचं कारण आलं समोर...

८३०८५०४७५५ या क्रमांकावर केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन केंद्राचे प्रमुख हनुमंत परब यांनी केले आहे. सरकारकडून केंद्राला ही वाहनसेवा देण्यात आलीये आणि म्हणूनच जर का रस्त्यावर गुरं जखमी अवस्थेत आढळल्यास लगेचच दिलेल्या क्रमांकारावर संपर्क करावा अशी माहिती देण्यात आली आहे.

गोसंवर्धन केंद्रात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जखमी गुरांवर उपचार केले जात आहेत. मिलेल्या माहितीनुसार गेल्या आठ दिवसांत आठ गुरांवर उपचार करण्यात आलेत. अनेकांनी आर्थिक मदत करत या कार्याला हातभार लावला आहे आणि म्हणूनच अधिकाधिक मदत करत कार्यात हातभार लावावा अशी विनंती करण्यात आलीये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com