Valpoi Mla Deviya Rane Dainik Gomantak
गोवा

Valpoi News : युवा पिढीच्या पुढाकारामुळेच होतो गावाचा खरा विकास : डाॅ. दिव्या राणे

Valpoi News : श्री सातेरी केळबाई देवस्थानसमोरील कम्युनिटी हॉलचे उद्‌घाटन; 1 कोटी रुपयांचा खर्च

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi News : वाळपई, ज्यावेळी गावातील युवा पिढी चांगले शिक्षण घेऊन आयुष्यात पुढे जाणार त्याचवेळी गावाचा विकास होईल.

त्यामुळे आजच्या पिढीने आपले ध्येय पूर्ण करताना गावाच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार डाॅ. दिव्या राणे यांनी गुळ्ळे-मोर्ले न्यू काॅलनी येथील श्री सातेरी केळबाई देवस्थानसमोरील कम्युनिटी हॉलच्या उद्‌घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.

यावेळी व्यासपीठावर मोर्लेचे सरपंच अमित शिरोडकर, जि.पं. सदस्य देवयानी गवस, उपसरपंच रुचिता माईणकर, रंजना गावस, देवस्थान पुजारी गुरुदास गावस, शोभा गावस, माजी सरपंच शुभदा गावस, महेश तांबट, विठ्ठल गावस तसेच इतर पंचसदस्य उपस्थित होते. या सभागृहासाठी एकूण १ कोटी रुपये खर्च आला आहे.

या सभागृहाचे काम मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि ग्रामविकास मंत्री गोविंद गावडे यांच्या अमूल्य सहकार्यामुळे शक्य झाले. त्यामुळे मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानते. या सभागृहामुळे मॉर्लेमधील लोकांना लक्षणीय फायदा होणार आहे, असे डॉ. दिव्या राणे यांनी सांगितले.

यावेळी सरपंच अमित शिरोडकर यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा गावस यांनी केले. यावेळी माजी सपपंच सुभदा गावस व कंत्राटदार प्रशांत नाईक यांचा आमदार डाॅ. दिव्या राणे यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला.

प्रतापसिंह राणेंनी केली सुरुवात

सत्तरीच्या विकासाची खरी सुरुवात माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी केली. त्यांचा वारसा पुढे नेण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यांच्यामुळे निवडणुकीत विजयी झाले. आज पर्ये मतदारसंघाचा विकास झपाट्याने सुरू आहे.

मोर्ले काॅलनीत २०० कोटींची विकासकामे सुरू आहेत. १५ एमएलडी पाणी प्रकल्प आणि पाणी सिंचन प्रकल्प ही कामे येणाऱ्या दिवसांत पूर्ण झाली तर गावाला एक वेगळे वैभव प्राप्त होणार आहे.

निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा आपला सतत प्रयत्न असतो. मी खोटी आश्वासने देत नाही. निवडणुकीपूर्वी हा प्रकल्प हाती घेतला होता. त्यामुळे हा प्रकल्प आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज या सभागृहाचे उद्‌घाटन करताना अत्यंत आनंद होत आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून लोकांच्या मागणीची पूर्तता झाल्याचे समाधानही वाटते.

- डॉ. दिव्या राणे, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

Who is Samreen Kaur: टीम इंडियाचा मॅचविनर 'समरीन'च्या प्रेमात क्लिन बोल्ड! गर्लफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर; पाहा कोण आहे ती?

SCROLL FOR NEXT