Valpoi Dainik Gomantak
गोवा

Valpoi: वाळपईत बाजारानंतर कचरा रस्त्यावर; विक्रेत्‍यांचा निष्‍काळजीपणा, दंडात्मक कारवाई करण्याची मागणी

Valpoi Market Garbage Issue: वाळपई शहरात बहुतांश विक्रेते आपला टाकाऊ माल तेथेच टाकून देत असल्‍यामुळे परिसरात अस्वच्छता पसरलेली दिसते.

गोमंतक ऑनलाईन टीम

वाळपई: वाळपई शहरात बहुतांश विक्रेते आपला टाकाऊ माल तेथेच टाकून देत असल्‍यामुळे परिसरात अस्वच्छता पसरलेली दिसते.

दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडा बाजारासह इतर दिवशीही रस्त्यालगत व्यवसाय करणारे व्यापारी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला, फळे, फुले, मासे, कपडे, चप्पल आदी वस्तूंची विक्री करतात.

महाराष्ट्र व कर्नाटकातूनही अनेक व्यापारी येथे येतात. मात्र बाजार आवरल्यानंतर विक्रीतून निर्माण झालेला कचरा रस्त्यावरच टाकून निघून जात असल्याने रात्रभर ते सकाळी सुमारे नऊ वाजेपर्यंत परिसर गलिच्‍छ असतो.

प्रत्येक व्यापाऱ्याने स्वतःचा कचरा पिशवी, बॉक्स किंवा अन्य पात्रात भरून निश्चित ठिकाणी ठेवावा किंवा त्यासाठी पालिकेने आवश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे. त्यामुळे सकाळी कचरा उचलणे अधिक सोपे होईल आणि शहराची स्वच्छता राखण्यास मदत मिळेल.

पालिका कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण

वाळपई नगरपालिकेचे कर्मचारी स्वच्छतेचे काम चोखपणे पार पाडत असले तरी व्यापाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्यावर अतिरिक्त ताण पडत आहे. पालिकेने व्यापाऱ्यांसाठी कचरा व्यवस्थापनाचे कडक नियम लागू करून कचरा रस्त्यावर टाकण्यास बंदी घालावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colombia Earthquake: जमीन फाटली अन् इमारती कोसळल्या, डोळ्यांदेखत उडाली दाणादाण! कोलंबियातील भीषण भूकंपात 132 मृत्यू, 1500 हून अधिक घरे उद्ध्वस्त VIDEO

New Head Coach: वर्ल्ड कपच्या तोंडावर मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षक बदलला, आता 'या' व्यक्तीवर मोठी जबाबदारी

Rohit Sharma TV Show: क्रिकेटनंतर मनोरंजन विश्वात 'हिटमॅन'ची नवी इनिंग; रोहित शर्माचा स्वतःचा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Shukra Gochar 2026: कौटुंबिक सुख, रोमान्स अन् अफाट पैसा...! शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन; 5 राशींना होणार तगडा धनलाभ

Savanar Maye tree fall: सावनार-मये येथे घरावर कोसळली झाडे, दोन लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान; मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT