Valpoi Market Issues: दरवर्षी पावसाळ्‍यात वाळपई शहराला अनेक समस्या सतावतात
Valpoi Market  Dainik Gomantak
गोवा

Valpoi News: ताडपत्रीच्या आधारावर भरतो बाजार, सर्वत्र खड्डेच खड्डे, रस्त्यांवर सांडपाणी

गोमन्तक डिजिटल टीम

दरवर्षी पावसाळ्‍यात वाळपई शहरात अनेक समस्या निर्माण होतात. त्‍यामुळे लोकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. विशेष करून मंगळवारच्‍या आठवडी बाजाराचा बोजवारा उडतो. त्या दिवशी बाजार रस्त्यावरच उघड्यावर भरतो. अशा वेळी पावसापासून संरक्षण करण्‍यासाठी व्यावसायिकांना ताडपत्रीचा आधार घ्‍यावा लागतो.

वाळपई (Valpoi) बाजारातील विक्रेत्‍यांना अनेक समस्‍या सतावत आहेत. पाऊस मोठा आला तर ताडपत्रीतून पाणी झिरपतेच. त्‍यामुळे ग्राहकांनाही त्रास होतो. तरीसुद्धा पावसाळ्यात वाळपईचा आठवडा बाजार ताडपत्री छपराच्या आधारावरच अवलंबून असतो. त्यातच बाजारात फिरताना भटक्या गुरांचाही त्रास होतोय.

हा बाजार रस्त्यावर भरतो. त्‍यावर उपाय म्हणून वाळपई आठवड्याच्या बाजाराला नवे रूप देण्याची गरज आहे. तसे झाले तर चांगली सुविधा सर्वांना प्राप्त होईल, असे बोलले जात आहे.

आठवडा बाजार सुसज्ज जागेत भरला तर पावसाळ्यात वाळपई शहरात होणारी वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईल. रस्त्यालगत घातलेल्या गटारांच्या लाद्यांवर हे विक्रेते आपली दुकाने मांडून व्‍यवसाय करतात.

पावसाळ्यात अशा अवस्थेत व्यवसाय करणे तारेवरची कसरत असते. या सर्व गोष्टींचा विचार करून शहरातील रस्ता मोकळा रहावा म्हणून नव्या बाजारसंकुलाची संकल्पना हाती घेण्याची जरूरी आहे. त्यासाठी सर्व व्यावसायिक तसेच लोकांना विश्वासात घेऊन सरकारने पावले उचलण्याची गरज आहे. वाळपई शहराला जुना इतिहास आहे. व्यवसायाच्या माध्यमातून अनेक परराज्यांतील माणसे जोडली गेली आहेत.

इस्पितळासमोर हवी निवारा शेड

वाळपई शहरात सरकारी आरोग्यकेंद्र आहे. तेथे दररोज असंख्य रुग्ण येतात. काही रुग्ण आपल्या कुटुंबीयांसोबत बसने येतात. त्यात ज्‍येष्ठांबरोबरच गरोदर महिलांचाही समावेश असतो. त्यांना घरी जाताना प्रवासी बसची वाट पाहत रस्त्यालगत उभे रहावे लागते. त्‍यामुळे या मुख्य रस्त्यालगत निवारा शेडची बांधण्‍याची गरज आहे.

वेळूस-वाळपई रस्ता चिखलमय

वाळपईतील वेळूस भागात सुमारे दीडशे मीटरचा रस्ता खड्डेमय बनला आहे. पावसाळ्यात आता तो चिखलमय बनला आहे. त्‍यामुळे वाहनचालकांना मोठा मन:स्‍ताप सहन करावा लागतोय. वीजवाहिनी घालण्यासाठी जानेवारी महिन्‍यात खणलेला हा रस्ता पूर्ववत केला नसल्याने आता तो खड्डेमय बनला आहे.

दुर्गंधीयुक्त सांडपाणी वाहते रस्‍त्‍यावरून

वाळपई शहरात रस्त्यालगत गटार बांधणी केलेली आहे. वाळपई पालिकेने मे महिन्यात गटार उपसणीची कामे केली होती. पण काही ठिकाणी गटारांत अजून कचरा, सांडपाणी दिसून येते आहे. पावसाळ्यात ही समस्या उग्र बनली आहे. काही लोक प्लास्टिक तसेच ओला कचराही गटारात टाकतात. पावसाळ्यात गटारातील सांडपाणी रस्‍त्‍यावरून वाहत असल्‍यामुळे लोकांना दुर्गंधी सोसावी लागते. विशेष म्‍हणजे या घाणीतच विक्रेते आणि ग्राहक खरेदी-विक्री करत असतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Jammu & Kashmir Terrorist Attack: कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराचे 4 जवान ठार, 6 जखमी

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

SCROLL FOR NEXT