Valpoi Late Night Alcohol Sale Dainik Gomantak
गोवा

Valpoi Illegal Liquor Sale: रस्त्याकडेलाच रंगतायेत 'ओपन बार'! वाळपईत मद्यपींचा उच्छाद; प्रशासकीय यंत्रणा कोमात, तस्कर जोमात

Valpoi Late Night Alcohol Sale: वाळपई शहरात दारूविक्रीची अनेक दुकाने असून त्यांच्यावर कोणतेही ठोस नियंत्रण दिसून येत नाही.

गोमंतक ऑनलाईन टीम

वाळपई: राज्यात दारूच्‍या व्यसनाचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे. पावलोपावली दारूची दुकाने उभी राहत आहेत. याचा सर्वाधिक परिणाम युवकांवर होत असून अनेक ठिकाणी ते खुलेआम मद्यपान करताना दिसून येतात. यामागील प्रमुख कारण म्हणजे बारसोबतच घाऊक (होलसेल) दारू दुकानांची वाढलेली संख्‍या.

वाळपई (Valpoi) शहरात दारूविक्रीची अनेक दुकाने असून त्यांच्यावर कोणतेही ठोस नियंत्रण दिसून येत नाही. नियमांनुसार दारू दुकाने रात्री १० वाजेपर्यंत बंद करणे बंधनकारक असताना अनेक घाऊक दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत तसेच सण-उत्सवांच्या काळात रात्रभर सुरू असतात. सरकार व संबंधित खात्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

घाऊक दारू दुकाने केवळ विक्रीसाठी असली तरी प्रत्यक्षात अनेक जण बाटल्या घेऊन दुकानाबाहेर किंवा रस्त्याच्या कडेला बसून खुलेआम मद्यपान करताना दिसतात. यात युवक व बिगर-गोमंतकीय कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. सहज उपलब्ध दारूमुळे हा प्रकार अधिक वाढत असून सामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रभावशाली व्यक्तींशी संबंधित दुकाने उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास मुभा मिळते, मात्र सामान्य व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई होते, असा दुजाभाव असल्याचा आरोपही केला जात आहे.

गोवा उत्पादन शुल्क कायदा, १९६४ नुसार...

घाऊक किंवा किरकोळ दुकानात अथवा आसपास मद्यपान बेकायदेशीर

परवानाधारकाने दुकानाचा गैरवापर होणार नाही याची जबाबदारी घ्यावी लागते

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान हा गुन्हा

भा.दं.वि. कलम २६८ : सार्वजनिक उपद्रव

कलम २९० : सार्वजनिक त्रासाबद्दल दंड

वारंवार उल्लंघन झाल्यास परवाना निलंबित किंवा रद्द होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भाजपची अभेद्य भिंत अन् विरोधकांचे 'बुद्धिबळ'! जिल्हा पंचायत निवडणुकीचा 'पोस्टमॉर्टम' रिपोर्ट; अधिकारांविना चाललेल्या लोकशाहीचा कुणाला फायदा?

कदंब साम्राज्याचा रक्तरंजित अंत! 52 जहाजांचा ताफा अन् राजपुत्राचा विश्वासघात; गोव्याच्या इतिहासातील 'ती' काळी रात्र

गोव्यात नववर्षासाठी 'तगडा' बंदोबस्त! अमली पदार्थ तस्करांवर पोलिसांची करडी नजर; पणजीतील विद्यार्थी सांभाळणार वाहतुकीची धुरा

आपण नक्की कोण? गोमंतकीयांच्या आदिम मुळांचा आणि 'कुर' समुदायाचा रंजक शोध; मिथकांच्या आड दडलेला गोवा निर्मितीचा इतिहास

Goa Live News: काणकोणच्या भूजलात धातूंचे घातक प्रदूषण

SCROLL FOR NEXT