Valpoi  Dainik Gomantak
गोवा

Valpoi News : गरजवंत गुरव कुटुंबीयांच्‍या मदतीसाठी सरसावले हात

Valpoi News : मुलगा अपंग, नातू अल्‍पवयीन; भागिरथी रेटतेय संसारगाडा

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई, वाळवंट, ब्रह्माकरमळी-सत्तरी येथील अत्यंत गरीब घराण्यातील भागिरथी गुरव यांचा मुलगा संदीप गुरव हा गेली तीन वर्षे असाध्‍य आजाराशी लढा देत आहे.

त्‍याला नीट उभे राहता येत नाही. या कुटुंबाला मदत मिळावी यासाठी अनेकांनी सोशल मीडियावर मागणी केली होती. त्‍याअनुषंगाने आता मदतीचे हात हळूहळू पुढे सरसावू लागले आहेत.

राज्‍याच्‍या विविध भागांतून मदत करण्यासाठी लोक पुढे येऊ लागले आहेत. सांतआंद्रे मतदारसंघातील डोंगरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अजित बकाल व ओल्ड गोवा येथील करमळी पंचायतीचे पंच राजेश नाईक यांनी गुरव कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांता पुढील तीन महिन्यांसाठी साहित्य व कडधान्‍य दिले आहे.

तसेच भागिरथी यांच्‍या नातवाच्या पुढील शिक्षणासाठी गरज पडल्यास आर्थिक मदतीचा हात दिला जाईल असे स्पष्ट केले आहे.

गुरव कुटुंब खूपच गरिबीत दिवस काढत आहे. तसेच भागीरथी यांचा मुलगा संदीप हा आजारीच असतो. अपंगत्वामुळे त्‍याला व्यवस्थित उभे देखील राहता येत नाही. या कुटुंबाला आणखी कोणाचा आधार नाही.

याबाबत बोलताना अजित बकाल म्हणाले की, काही माणसे दररोज आपल्यासाठी हजारो रुपये खर्च करत असतात. त्यासाठी कष्ट करतात, मेहनत करतात. यातीलच काही भाग आपण सामाजिक जबाबदारी ओळखून कोणा गरजूंसाठी दिला तर एखाद्या कुटुंबाला आधार मिळू शकतो.

वाळपई गणेशोत्सव मंडळाने स्‍वीकारली नातवाच्‍या शिक्षणाची जबाबदारी

ब्रह्माकरमळी येथील गुरव कुटुंब सध्‍या हलाखीच्‍या परिस्थितीत जीवन जगत आहे. वाळपई भागातून रोशन देसाई, अब्दुल्ला खान तसेच वाळपई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने देखील गुरव कुटुंबाला गरजू वस्तू प्रदान केलेल्या आहेत. तसेच मंडळाने भागीरथी गुरव यांच्या नातवाच्या दहावीपर्यंत शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.

काही माणसे दररोज आपल्यासाठी हजारो रुपये खर्च करत असतात. त्यासाठी कष्ट घेतात, मेहनत करतात. त्‍यातीलच काही भाग आपण सामाजिक जबाबदारी ओळखून कोणा गरजूंसाठी दिला तर एखाद्या कुटुंबाला आधार मिळू शकतो.

- अजित बकाल,

माजी सरपंच (डोंगरी)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT