procession Gomantak Digital Team
गोवा

Valpoi News : धावेत गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा उत्साहात

गावातील पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi News : धावे सत्तरी येथे श्री. सातेरी शांतादुर्गा मंदिरात नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त २२ रोजी हिंदू नववर्ष स्वागत समिती धावेतर्फे शोभायात्रा काढण्यात आली. यात गावातील पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.

सकाळी ७ वाजता प्रभात फेरीला ब्रह्मध्वजाची विधीवत पूजा, पंचारती ओवाळून करून सुरवात करण्यात आली. ‘भारत माता की जय’ अशा विविध घोषणा समेळ वाद्यांच्या सानिध्यात गर्जना करण्यात आली. त्यामुळे वातावरण प्रसन्न बनले होते.

शोभायात्रेनंतर मंदिरात प्रकट कार्यक्रम झाला. यावेळी ज्येष्ठ शिक्षक गणपतराव राणे, ज्येष्ठ नागरिक राम ओझरेकर, देवस्थानचे गावकर दशरथ गावकर, गणेश माटणेकर आदींची उपस्थिती होती. राणे म्हणाले, की आपल्या जीवनात निरोगी जीवन, सुख समृद्धी नांदेल असे विचार बाळगले पाहिजेत.

आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण दिले पाहिजे. गणेश माटणेकर यांनी प्रास्ताविक, मान्यवरांची ओळख व पद्य सादर केले. सूत्रनिवेदन आरती माटणेकर व मेघा गावकर यांनी पसायदान सादर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT