Higher Secondary School Gomantak Digital Team
गोवा

Valpoi News : वाळपईतील सरकारी शाळेच्या इमारतीला मिळाली नवी झळाळी

पालकांत समाधान : नव्या शैक्षणिक वर्षाला आज प्रारंभ

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi News : येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या धोकादायक इमारतीच्या दुरुस्तीचे काम अखेर पूर्ण झाले आहे. त्यामुळे पाच जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना नवी झळाळी प्राप्त झालेली इमारत मिळणार आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

इमारतीच्या दुरुस्तीसाठी 66 लाख रुपये खर्च झाले. स्थानिक आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या प्रयत्नाने हा प्रस्ताव पूर्ण होऊ शकला. या विद्यालयात सुमारे 550 विद्यार्थी शिकतात. यात कला, वाणिज्य, विज्ञान, हाॅर्टीकल्चरसह इयत्ता अकरावी व बारावीचे वर्ग आहेत.

वर्षभरापासून रखडला होता प्रस्ताव

25 वर्षांपासून या इमारतीची दुरुस्ती केलेली नव्हती. धोकादायक इमारतीमुळे अपघाताची शक्यता होती. एक वर्षापासून दुरुस्तीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नव्हती. काही महिन्यांपूर्वी वर्ग सुरू असतानाच दोन विद्यार्थ्यांवर छप्पराच्या सिमेंटचा तुकडा पडला. त्यावेळी दै. ‘गोमन्तक’ वृत्त प्रसिद्ध केल्याने विधानसभेत हा प्रश्न गाजला. यासंदर्भात वेळोवेळी वर्तमानपत्रांतून आवाज उठविल्यानंतर साबांखाने इमारतीची तात्पुरती दुरुस्ती केली होती. अखेर कायमस्वरूपी दुरुस्तीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळवून हे काम पूर्ण केले.

ही इमारत जुनी झाल्याने पावसाळ्यात छप्परामधून पाणी वर्गात शिरत होते. यामुळे मुलांना अनेकदा विजेचा शॉक लागला होता. त्यामुळे वर्गात मुले जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत होती. पालकांनी वेळोवेळी सरकारकडे इमारत दुरुस्तीची मागणी केली होती. त्यामुळे मंत्री राणे यांच्या प्रयत्नाने अखेर या दुरुस्तीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आणि कामही पूर्ण झाले.

- प्राचार्य रियाज जमादार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT