Dengue Patients Dainik Gomantak
गोवा

Valpoi News : वाळपईत डेंग्यू रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

गतवर्षी मेपासून सत्तरीत डेंग्यूचे मोठ्या संख्येत रुग्ण सापडले होते. त्यामुळे यंदा दक्षता घेण्यात आली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi News : वाळपई सध्या राज्यात डेंग्यूच्या रुग्णांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे वाळपई येथील शासकीय इस्पितळ सतर्क झाले आहे. अनेक भागात डेंग्यू पसरू नये म्हणून फवारणी व जनजागृतीही करण्यात येत आहे.

काही दिवसांपासून बदलत्या हवामानामुळे ताप येणे, सर्दी आदी प्रकारात वाढ झालेली आहे. यात काही जणांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सप्टेंबर महिन्यात एकूण ६ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. मात्र सर्वांची प्रकृती चांगली आहे.

डेंग्यूची लागण झालेल्या रूग्णांनी वेळेवर उपचार घेतले होते. त्यामुळे कोणताही अनर्थ घडलेला नाही. गतवर्षी मेपासून सत्तरीत डेंग्यूचे मोठ्या संख्येत रुग्ण सापडले होते. त्यामुळे यंदा दक्षता घेण्यात आली होती.

डेंग्यू रूग्णांच्या पार्श्‍वभूमीवर सत्तरी इस्पितळातर्फे जनजागृती मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. तसेच ज्या रुग्णांना ताप, अंग दुखी किंवा इतर त्रास होत असेल तर त्यांना तातडीने आरोग्य तापसणी करावी. तसेच घराशेजारी स्वच्छता ठेवावी. कुठेही पाणी साचू नये, याची काळजी घ्यावी.

-डाॅ. विकास नाईक, वाळपई आरोग्य अधिकारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT