Dengue Cases In Goa Dainik Gomantak
गोवा

Dengue Cases In Goa: वाळपईत डेंग्यूचे दोन रुग्ण; आरोग्य यंत्रणा सतर्क

Dengue Cases In Goa: दोन वर्षापूर्वी मोठ्या संख्येने सत्तरी तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण सापडले होते. आरोग्य विभागाने यंदा पावसाळ्यापूर्वीच जागृती मोहीम हाती घेतली होती. तसेच औषध फवारणी व अन्य उपायांवर भर दिला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Dengue Cases In Goa

राज्यात मलेरिया, डेंग्यू सारखे आजार तोंड वर काढू लागले आहेत, त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. वाळपईत २ डेंग्यूचे रुग्ण आढळले असून आतापर्यंत एकूण पाचजणांना डेंग्यूची लागण झाली आहे.

एकाच घरातील दोघांना डेंग्यूची लागण झाली होती. उपचारानंतर सर्व रुग्ण बरे झाले असून त्यांचा प्रकृती चांगली आहे. वेळेवर उपचार मिळाल्याने कोणताही अनर्थ घडलेला नाही.

दोन वर्षापूर्वी मोठ्या संख्येने सत्तरी तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण सापडले होते. आरोग्य विभागाने यंदा पावसाळ्यापूर्वीच जागृती मोहीम हाती घेतली होती. तसेच औषध फवारणी व अन्य उपायांवर भर दिला आहे.

बागायतीत साफसफाई ठेवा

सत्तरीत मोठ्या प्रमाणात कुळागरे, बागायती आहेत. त्यात नारळ, इतर कचरा तसेच जलसिंचन खात्यातर्फे बागायत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत. यात पाणी साचून डासांची पैदास होऊ शकते.

त्यामुळे जलसिंचन खात्याने पावसाळ्यात डासांची पैदास होऊ नये म्हणून काळजी घेण्याची गरज आहे. तसेच नागरिकांनीही आपल्या बागायतीत पाणी साचून राहणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे, असे डॉ. विकास नाईक यांनी सांगितले.

मडगाव परिसरातही दोन रुग्ण सापडले

फातोर्डा राज्यभरात पावसामुळे अनेक ठिकाणी डासांच्या पैदासीमुळे अनेक ठिकाणी मलेरिया व डेंग्यूचे रुग्ण सापडत असून मडगाव परिसरात दोन डेंग्यूचे दोनच रुग्ण आढळल्याची माहिती मडगाव आरोग्य खात्याचे प्रमुख डॉ. बाप्टिस्ट मास्कारेन्हस यांनी दिली. या विषयी माहिती देताना त्यांनी सांगितले, की दोन्ही रुग्ण परराज्यातील आहेत.

यातील एक रुग्ण बंगळुरू येथील होता व दुसरा रुग्ण महाराष्ट्रातील पुणे येथील होता. या दोन्ही रुग्णांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात आले आहे व ते आपल्या राज्यात परत निघून गेले आहेत. यात कोणत्याही स्थानिक रहिवाशांचा समावेश नाही.

या प्रकरणी मडगाव आरोग्य केंद्राचे अधिकारी मडगाव नगरपालिका प्रभागात फिरून स्वच्छता राखण्यासाठी जनजागृती करीत आहेत व कुठेही पाणी साचल्यास स्थानिकांना स्वछता राखण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत, अशी माहिती डॉ. बाप्टिस्ट मास्कारेन्हस यांनी दिली आहे. मागील तीन वर्षांपासून पाजीफोंड व मालभाटमध्ये मलेरिया व डेंग्यूचे अनेक रुग्ण सापडले होते. यातील काहींनी खासगी इस्पितळात उपचार घेतले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'न्यायव्यवस्था न्याय देऊच शकत नाही, आपल्यालाच करावं लागेल' चित्रपटांनी रुजवलेली मानसिकता धारगळ ॲसिड हल्ल्याला जबाबदार?

Banda Accident: बांदा पुलावर मध्यरात्री थरार! कार ओहोळात कोसळली, काहीजण अडकल्याची भीती; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू

खरी कुजबुज, दामू बाबूंशी काय बोलले?

Shivling Waterfall: नो टेन्शन, फक्त एन्जॉय! पालीच्या शिवलिंग धबधब्यावर सुरक्षित पर्यटनासाठी वनखात्याची विशेष व्यवस्था

Goa Education: कुठल्याही वयात द्या परीक्षा, नापास होण्याची भीती कायमची मिटली; काय आहे 'सरकारची खासगी विद्यार्थी योजना'?

SCROLL FOR NEXT