Drugs case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs : ड्रग्‍स पेडलरच्‍या अटकेमुळे संशयाची सुई वाळपईकडे

सत्तरी तालुक्यातही अंमलीपदार्थांचा पुरवठा होतो का, असा प्रश्न आता उपस्‍थित होऊ लागला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Drugs : राज्यात सध्या चर्चेत असलेल्या सोनाली फोगट मृत्यूप्रकरणी जे संशयित आढळले आहेत, त्यात ड्रग्स पेडलर म्हणून दत्तप्रसाद गावकर याला अटक झाल्यानंतर संशयाची सुई वाळपईकडे वळली आहे. सत्तरी तालुक्यातही अंमलीपदार्थांचा पुरवठा होतो का, असा प्रश्न आता उपस्‍थित होऊ लागला आहे.

युवापिढी ड्रग्‍सच्‍या विळख्यात अडकत चालली आहे. त्यात माध्यमिक, महाविद्यालयीन युवक-युवतींचे प्रमाण मोठे आहे. याला आळा बसणे तितकेच गरजेचे आहे. शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात अंमलीपदार्थांचा वापर सर्रासपणे केला जातोय. त्‍यामुळे पालकांची जबाबदारी वाढली आहे. एकदा अंमलीपदार्थाच्या विखळ्यात सापडल्यानंतर त्यातून बाहेर पडणे मुश्कील होते. त्यामुळे या प्रकाराला आळा बसण्यासाठी कठोर कारवाई अतिआवश्यक आहे.

आजची युवा पिढी बिनधास्त आहे. मौजमजा करण्यासाठी युवक अंमलीपदार्थाच्या जाळ्यात फसतात. त्यात हे व्यसन एकाकडून दुसऱ्याकडे पसरते. रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी, रेस्‍टॉरंट, दिवसाढवळ्याही काही भागात असे प्रकार होत आहेत. आपली मुले घराबाहेर काय करतात हे पालकांना माहीत नसते. त्‍यामुळे दारू, ड्रग्स यात युवक आपले जीवन बरबाद करीत आहेत. पोलिसांनी रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी गस्त वाढविली पाहिजे. तसेच काही संशयास्पद आढळले तर त्याची चौकशी करावी. वाळपईत काही अशी निर्जनस्थळे आहेत तिथे असे प्रकार होत असण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्‍यामुळे अशा प्रकारांकडे पोलिसांनी बारीक नजर ठेवणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT