Valpoi  Dainik Gomantak
गोवा

Valpoi News : पिसुर्ले पंचायत क्षेत्रात खाणी सुरू करण्याचा प्रयत्न : आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे

Valpoi News : खाण अवलंबितांनी रोजगाराची चिंता करू नये; प्रचारसभेत आश्वासन

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi News :

वाळपई, पिसुर्ले भागातील खनिज खाणीचा व्यवसाय गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे. यामुळे या भागातील लोकांचे आर्थिक गणित कोलमडलेले आहे.

निवडणुकीनंतर या भागातील खाणींच्या लिलावाची प्रक्रिया शक्यतो लवकर हाती घेण्याचे प्रयत्न राहतील. या खाण व्यवसाय सुरू झाल्यानंतर या भागातील अनेक समस्या सुटणार आहेत. रोजगाराची चिंता करण्याची गरज नाही, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

पर्ये मतदारसंघातील पिसुर्ले पंचायत क्षेत्रात आयोजित कोपरा बैठका ते बोलत होते. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी व्यासपीठावर पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे, विनोद शिंदे , होंडा जिल्हा पंचायत सभासद सगुण वाडकर, पंचायतीचे सरपंच देवानंद परब, पंच सदस्य आत्माराम परब, नामदेव चारी, बिजली गावडे, बालकृष्ण शिलकर, राजश्री रामा जल्मी, रुपेश कृष्णा गावडे आदींची खास उपस्थित होती.

विश्‍वजीत राणे म्हणाले की, या भागात खनिज खाणीचा प्रमुख मुद्दा आहे. सरकारने अनेक ठिकाणी असलेल्या खनिज खाणीचा लिलाव सुरू केलेला आहे. मात्र, या भागातील खनिज खाणींच्या व्यवसायाला अजून सुरुवात झालेली नाही. यामुळे या भागातील व्यावसायिकांचे गणित पूर्णपणे कोलमडले आहे.

त्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. यासाठी या भागातील खनिज व्यवसाय सुरू होणे ही काळाची गरज आहे. निवडणकीनंतर या संदर्भात प्रक्रिया गतिमान व्हावी यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

पर्ये मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहे. दोन वर्षांत अनेक प्रलंबित असलेल्या समस्या सुटलेल्या आहेत. आजवर उपलब्ध नसलेल्या अनेक पायाभूत सुविधा मतदारसंघांत निर्माण झालेल्या आहेत. यापुढेही आणखी विकासकामे मार्गी लागतील. याची दखल घेऊन केवळ विकासामुळे सर्वांनी भाजपच्या उमेदवाराच्या मागे खंबीरपणे उभे रहावे.

-डॉ. दिव्या राणे,आमदार पर्ये

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: शुक्रवारचा दिवस ठरणार लाभदायक! 4 राशींना मिळणार यशाची नवी दिशा; कुटुंब, करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सकारात्मक बदलांचे संकेत

Goa Drugs Case: काणकोणमध्ये अंमली पदार्थांवर कारवाई; 26.9 ग्रॅम चरससह हॉटेलच्या वेटरला अटक

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

SCROLL FOR NEXT