Valpoi Agriculture Dainik Gomantak
गोवा

Valpoi Agriculture : शेतकऱ्यांच्या मागणीनुसार केली जाते बियाण्यांची विक्री : विश्वनाथ गावस यांची माहिती

Valpoi Agriculture : : सत्तरीत सेंद्रिय पद्धतीने भाजी लागवड; स्वयंरोजगाराची निर्मिती

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi Agriculture :

वाळपई, कृषी खात्याच्या कार्यालयातून पहिल्या टप्प्यातील भातबियाण्यांची विक्री सुरू झाली आहे. शेतकरी भातबियाण्यांच्या खरेदीसाठी गर्दी करत आहेत. तसेच टप्प्याटप्प्याने बियाण्यांची आयात करण्यात येणार आहे व मागणीनुसार कृषी खाते शेतकऱ्यांसाठी बियाणी उपलब्ध करून देणार आहे, असे वाळपई विभागीय कृषी कार्यालयाचे कृषी अधिकारी विश्वनाथ गावस यांनी सांगितले.

गावस म्हणाले की, यंदा सुरवातीच्या टप्प्यात बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झालेले आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांनी करून घेतला पाहिजे. तसेच बियाण्यांच्या किमतीवर ५० टक्के सवलत दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ती फायदाची आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेच यंदा लागवडीचे क्षेत्रफळ वाढण्याचा अंदाज आहे.

पावसाळ्यात अजूनही काही ठिकाणी सामूहिक पद्धतीने शेती केली जाते. त्यात शिरोली-केरी येथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात काटे कणगी व इतर कंदमुळांची लागवड शेतकरी करतात. तसेच गेल्या काही वर्षांपासून नाचणीचेही पीक मोठ्या प्रमाणात शेतकरी घेऊ लागले आहेत.

मे महिन्यात शेताची मशागत केली तर भातशेती, भाजी लागवड व इतर उत्पन्न चांगल्या प्रकारे घेता येते. त्यामुळे वाळपई विभागीय कृषी कार्यालयात शेतकऱ्यांसाठी मे महिन्यातच बियाणी तयार ठेवली जातात.

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत दिवसेंदिवस शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. मध्यंतरी काळात अनेकांनी शेती करणे बंद केले होते. मात्र, आज पुन्हा शेतकरी शेतीकडे वळू लागले आहेत. सेंद्रिय पद्धतीने भाजी लागवड करण्याच्या उद्देशाने आजची पिढी कृषी क्षेत्रात वळताना दिसत आहे. महिलांसाठी हे स्वयंरोजगाराचे साधन बनले आहे.

कृषी खात्यात उपलब्ध असलेली भाजी बियाणी :

कोथिंबीर, भोपळा, दोडकी (रेखा, गरिमा), वाल, चिबूड, कोहाळा, कारली (कथय, मिडोरी लांब), भेंडी (जेके ६२, राधिका), कोकणदुधी (वधन), मिरची (सितारा), चिटकी (पीएनबी), काकडी (राधिका), तांबडी भाजी, मुळा, नवलकोल, वांगी.

लवकरच भाजी उत्पादन :

यंदा सत्तरीत सुमारे १५ ते २० हेक्टर जमिनीत भाजी लागवड करण्यात येणार आहे. मागच्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. सत्तरीत जमिनीची मशागत करून बियाण्यांची पेरणी करण्यात सुरवात झाली आहे. तर काहींनी बिया पेरून त्यांची रोपेही उगवली आहेत, त्यामुळे येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांची भाजी तयार होणार आहे.

कृषी खात्याकडून मार्गदर्शन

जुलै ते सप्टेंबर महिन्यात भाजी लागवडीसाठी सुपीक वातावरण असते, असे शेतकऱ्यांचे मत आहे. सध्या कृषी खात्यातर्फे बियाण्यांवर ५० टक्के सवलत दिली जात असून कृषी खात्याच्या वाळपई कृषी अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांकडून योग्य ते सहकार्य व वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. पावसाळी काकडी, विविध कंदमुळे, भेंडी, घोसाळे, भोपळे, चिबूड तसेच इतर भाज्यांचा यात समावेश असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: ताबा सुटला, गोव्यात पर्यटकाची कार भिंतीला - ट्रकला धडकली; झारखंडची व्यक्ती जागीच ठार; Watch Video

Ranji Trophy: विजयासाठी गोव्याला 7 विकेटची गरज! फॉलोऑननंतर चंदीगडचा चिवट प्रतिकार; अर्जुनची झुंझार फलंदाजी

Ronaldo Goa Visit: रोनाल्डो गोव्यात फुटबॉल खेळणार? प्रशासन सज्ज; 22 ऑक्टोबर रोजी होणार सामना

Mhaje Ghar: ‘माझे घर’ला का विरोध केला हे विरोधकांना विचारा! CM सावंतांचे सांगेवासीयांना आवाहन

Goa Road Repair: 'नोव्हेंबर अखेरपर्यंत गोव्यातील रस्ते उत्तम स्थितीत', मंत्री कामतांनी दिली ग्वाही; रस्ता खोदणाऱ्यांसाठी दिला इशारा

SCROLL FOR NEXT