Vagator to Mopa Airport  Dainik Gomantak
गोवा

'एक दिवस गोव्यात येण्यासाठी व्हिसा लागेल', वागातोर ते मोपा टॅक्सीसाठी 1,200 रूपये मोजल्यानंतर संतापला पर्यटक

पर्यटकाने संताप व्यक्त करत राज्यातील या व्यवस्थेवर ताशेरे ओढले आहेत.

Pramod Yadav

गोव्यातील सार्वजनिक वाहतूक आणि त्यामुळे राज्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी निर्माण होणाऱ्या समस्या हा नवा विषय नाही. राज्यातील टॅक्सीवाले अधिक पैसे घेतात असा वारंवार आरोप केला जातो. येथील टॅक्सी धारकांच्या वर्चस्वामुळे येथे आजवर ओला, उबर यासारख्या खासगी कॅब सेवा पुरवणाऱ्या सुविधा सुरू झाल्या नाहीत.

दरम्यान, वागातोर ते मोपा विमानतळ असा टॅक्सी प्रवास करणाऱ्या एका पर्यटकाने या प्रवासासाठी 1,200 रूपये मोजले. त्यानंतर तो चांगलाच संतापला आहे.

झाले असे की शिवम वाहिया या व्यक्तीने वागातोर ते मोपा विमानतळ प्रवास करण्यासाठी 1,200 रूपये टॅक्सी भाडे मोजले. त्यानंतर शिवमने संताप व्यक्त करत राज्यातील या व्यवस्थेवर ताशेरे ओढले आहेत.

'राज्यात उबर आणि ओला सुरू न करणे हे मार्केटच्या विरोधात आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा गोव्यात येण्यासाठी प्रवेश फि द्यावी, तो एक प्रकारचा क्वासी व्हिसा आहे. गोव्यातील पोलीस हा विस्कळीतपणा संभाळू शकत नाहीत, सुधारणा करण्यासाठी दिल्लीने मदत पाठवायला हवी.' असे ट्विट शिवम यांनी केले आहे.

या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. एका युझरने गोव्यातील टॅक्सी भाडे धक्कादायक असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच, दुसऱ्या एका युझरने गोवा पेक्षा सिंगापूर परवडले असे खोचक ट्विट केले आहे.

तसेच, आणखी एकाने त्याला गोवा माईल्स बुक करण्याचा सल्ला दिला, त्यावर शिवम यांनी गोवा माईल्स बुक होत नसल्याचे सांगितले. आणखी एकाने त्याला दुजोरा देत गोवा माईल्सची सुविधा काही भागात सेवा देत नाही अशी तक्रार केली आहे.

दरम्यान, यापूर्वी देखील मोपा विमानतळ येथे जाण्यासाठी खासगी टॅक्सीवाले अधिक भाडे घेत असल्याची तक्रार केली आहे. सरकारकडून मोपावर ब्ल्यु टॅक्सी सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असन, याबाबत प्रक्रिया सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार! ODI World Cup 2027 मध्ये एकाच ग्रुपमध्ये दोन्ही संघ; टीम इंडियाचं संपूर्ण Schedule एका क्लिकवर

Industries Load Shedding: उद्योगांना वीज भारमानाचा मोठा फटका; सायंकाळी 5 ते रात्री 1 पर्यंत 50 ते 100 टक्के लोडशेडिंग

Horoscope: शुक्रवार ठरणार लकी! 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी, आर्थिक संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होणार

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

SCROLL FOR NEXT