vagator club fight Dainik Gomantak
गोवा

वागातोर नाईट क्लबमध्ये अरेरावीचा कळस! बाऊन्सर्सनी पर्यटकांना बडवले; लोखंडी सळ्या, दांडक्यांनी केली मारहाण

goa tourists attacked by bouncers: क्लबच्या बाऊन्सर्सनी क्षुल्लक वादातून या पर्यटकांवर लोखंडी सळ्या आणि दांडक्यांनी अमानुष हल्ला चढवला

Akshata Chhatre

vagator club violence: रात्रीच्या वेळी उत्तर प्रदेशातील बनारस येथून आलेल्या पाच पर्यटकांना व्हागातोर येथील एका लोकप्रिय नाईट क्लबमध्ये भयंकर अनुभव आला आहे. क्लबच्या बाऊन्सर्सनी क्षुल्लक वादातून या पर्यटकांवर लोखंडी सळ्या आणि दांडक्यांनी अमानुष हल्ला चढवला, ज्यात महिला पर्यटकही गंभीर जखमी झाल्या आहेत.

किरकोळ वादातून क्रूर हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, बनारस येथील काही भावंडे गोव्यात पर्यटनासाठी आली होती. रात्री उशिरा ते व्हागतोर येथील एका प्रसिद्ध क्लबमध्ये गेले. एका महिला पर्यटकाने दिलेल्या माहितीनुसार, शेजारच्या टेबलवरील ग्राहक अर्धवट खाऊन निघून गेले असतानाही, व्यवस्थापकाने त्यांच्याकडून पैसे घेतले.

क्लबमधला नाच, वेटरसोबत झालेली बाचाबाची यातून व्यवस्थापकाने बाऊन्सर्सना बोलावले आणि या साध्या वादाचे रूपांतरण लगेचच एका भयंकर रक्तपातात झाले. बाऊन्सर्सच्या टोळक्याने कोणत्याही प्रकारची सबब समजून न घेता थेट पर्यटकांच्या गटावर हल्ला केला. लोखंडी सळ्या, दांडके आणि लाथा-बुक्क्यांच्या मारामुळे अनेक पर्यटक जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले.

मद्यधुंद व्यवस्थापक आणि 'गुंडांचे' धाडस

या हल्ल्यातील सर्वात लाजिरवाणी बाब म्हणजे, पुरुष बाऊन्सर्सनी महिलांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप महिलांनी केला आहे. महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लबचा व्यवस्थापक कथितरित्या मद्यधुंद अवस्थेत तिथे उभा होता, व्यवस्थापकाच्या या निष्क्रिय भूमिकेमुळे बाऊन्सर्सना गुंडगिरी करण्याची अधिक मुभा मिळाली आणि त्यांनी क्रूरपणे हल्ला सुरू ठेवला.

शांत गोव्याचा आवाज दाबला जाऊ नये: पीडित महिलेचे भावनिक आवाहन

या हल्ल्यातील पीडित महिला पर्यटकाने गोमंतकीय नागरिकांना एक भावनिक आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, "गोवा हे आमचं आवडतं ठिकाण आहे आणि आम्ही गेल्या १० वर्षांपासून गोव्यात येतोय.

गोवा एक अतिशय शांत आणि सुंदर जागा आहे. मात्र, अशा काही अरेरावी करणाऱ्या व्यावसायिकांमुळे गोव्याच्या पर्यटनाचा व्यवसाय धोक्यात येईल आणि गोव्याचे रूपांतर दिल्लीत व्हायला वेळ लागणार नाही."

पीडित महिलेने गोवा पोलिसांच्या उत्तम सहकार्याची प्रशंसा केली. पण सोबतच, ही अरेरावी आणि गुंडगिरी तातडीने थांबवण्यासाठी समाजाने आवाज उठवण्याची गरज व्यक्त केली. "आम्ही याविरुद्ध नक्कीच लढा देऊ," असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

हणजूण पोलिसांकडून तपासाला गती

या गंभीर घटनेनंतर पीडित पर्यटकांनी हणजूण पोलीस स्टेशनमध्ये तातडीने एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी जखमी पर्यटकांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. या मारहाणीत पाच ते सहा बाऊन्सर्सचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी या सर्व आरोपी बाऊन्सर्सचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर तपास सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma Emotional: जल्लोष मैदानात, पण कॅमेऱ्यामनची नजर स्टँड्सवर! टीम इंडिया विश्वविजेता होताच 'मुंबईचा राजा' भावुक Video Viral

आम्हाला घाटी म्हणून हिणवू नका! गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र एकमेकांचे भाव; कन्नड मेटी यांनी तुकारामांना जोडले हात

Goa Today's News Live: कोकणीचे प्रमाणीकरण करण्याची घाई करु नये; नरेंद्र सावईकर

मडगावमध्ये धर्मांतराचा कार्यक्रम? पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यासोबत केली पाहणी, काय उघडकीस आलं?

Mike Mehta: 3 दशकांहून अधिक योगदान देणारे तियात्रकार, ‘गोंयकार’पणाचे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व - माइक मेहता

SCROLL FOR NEXT